सिंधुदुर्ग: ओटवणे जंगलात जखमी अवस्थेत आढळला गवा, लोकवस्तीत येण्याची भिती

By अनंत खं.जाधव | Published: September 15, 2022 11:57 AM2022-09-15T11:57:03+5:302022-09-15T11:57:37+5:30

जखमी गवा जंगलातून बाहेर लोकवस्तीत आल्यास कोणाला तरी इजा करेल या भितीने ग्रामस्थांमध्ये खळबळ

Bison found injured in Otwane forest Sawantwadi taluka Sindhudurg district, fear of coming into the population | सिंधुदुर्ग: ओटवणे जंगलात जखमी अवस्थेत आढळला गवा, लोकवस्तीत येण्याची भिती

सिंधुदुर्ग: ओटवणे जंगलात जखमी अवस्थेत आढळला गवा, लोकवस्तीत येण्याची भिती

Next

सावंतवाडी : तालुक्यातील ओटवणे मांजरधारा येथील जंगलात गवा जखमी अवस्थेत ग्रामस्थांच्या दृष्टीस पडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमी गवा जंगलातून बाहेर लोकवस्तीत आल्यास कोणाला तरी इजा करेल या भितीने ग्रामस्थांत खळबळ उडाली आहे.

याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली असून वनकर्मचारी वनपाल प्रमोद सावंत, वनरक्षक महादेव गेजगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वनकर्मचाऱ्यांनी जंगलात शोधाशोध केली असता त्यांना हा गवा दृष्टीस पडला. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याला चालता येत नाही अशातच तो रौद्ररूप धारण करतो यामुळे वनविभाग त्याच्यावर पाळत ठेवून आहे.

जखमी गवा जंगलात ठिकठिकाणी बसून असतो. पण गवा वस्तीनजीक आल्यास ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे. अलिकडेच गव्याने मारहाण केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे वनविभाग सर्तक आहे.

Web Title: Bison found injured in Otwane forest Sawantwadi taluka Sindhudurg district, fear of coming into the population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.