आघाडी सरकारविरोधात मालवणात भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 02:42 PM2020-02-26T14:42:51+5:302020-02-26T14:44:03+5:30

भाजप सरकार काळातील विकासाभिमुख कामांच्या निर्णयांना स्थगिती दिल्याने जनतेच्या मनात असलेला असंतोष आंदोलनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपच्यावतीने मालवण तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.

BJP agitation against Maoist government in Malwa | आघाडी सरकारविरोधात मालवणात भाजपचे आंदोलन

महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेविरोधात भाजपच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले.

Next
ठळक मुद्देआघाडी सरकारविरोधात मालवणात भाजपचे आंदोलनजोरदार घोषणाबाजी : मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

मालवण : भाजप सरकार काळातील विकासाभिमुख कामांच्या निर्णयांना स्थगिती दिल्याने जनतेच्या मनात असलेला असंतोष आंदोलनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपच्यावतीने मालवण तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीची शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी घोषणा, अवकाळी पावसातील नुकसानग्रस्तांच्या मदतीकडे दुर्लक्ष, महिलांवरील वाढते अत्याचार याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मालवण तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ वाजल्यापासून धरणे आंदोलनास सुरुवात झाली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अजय पाटणे यांना सादर करण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, विलास हडकर, बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, दीपक पाटकर, महिला बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, बाबा परब, उमेश नेरुरकर, अशोक तोडणकर, आप्पा लुडबे, भाऊ सामंत, महेश जावकर, जगदीश गावकर, महेश मांजरेकर, मंदार लुडबे, बबलू राऊत, पंकज पेडणेकर, संतोष गावकर, दादा नाईक, सुशील शेडगे, सरोज परब, नीलिमा सावंत, ममता वराडकर, चारुशीला आचरेकर, पूजा करलकर, स्नेहा केरकर, सागरिका लाड यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, पूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याने जनतेच्या मनात सुरक्षितता निर्माण होण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. जिल्हा विकास आराखडा निधी पूर्वीप्रमाणे २५० कोटींपेक्षा जास्त मिळावा. सीएए कायद्याची अंमलबजावणी राज्यात झाली पाहिजे, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार पाटणे यांना दिले.

 

Web Title: BJP agitation against Maoist government in Malwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.