भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर

By admin | Published: February 2, 2017 11:59 PM2017-02-02T23:59:27+5:302017-02-02T23:59:27+5:30

सिंधुदुर्ग जिल्हापरिषद तसेच पंचायत समिती निवडणुक स्वबळावर लढणार असल्याचे जाहिर करीत शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी

BJP announces first list of candidates | भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर

Next
ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 02 - सिंधुदुर्ग जिल्हापरिषद तसेच पंचायत समिती निवडणुक स्वबळावर लढणार असल्याचे जाहिर करीत शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी पहिली उमेदवार यादी जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर राणे काँग्रेसला हरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे सांगत भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी 27 जिल्हापरिषद् तर 19 पंचायत समिती मतदार संघातील उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर केली.
 येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यानी ही यादी जाहिर केली. यावेळी भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली, कणकवली तालुकाध्यक्ष रविंद्र शेट्ये, मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, राजन चिके, मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर, विलास हड़कर आदी उपस्थित होते.
         प्रमोद जठार यांनी जाहिर केलेल्या उमेदवार यादीत जिल्हा परिषद मतदार संघातील कणकवली तालुक्यातील कासार्डे: संजय संभाजी पाताड़े, जानवली: पूजा प्रशांत चव्हाण, कलमठ: प्रज्ञा प्रदीप ढवण, खारेपाटण: रघुनाथ उर्फ़ भाऊ राणे, फोंडाघाट: राजन बाळकृष्ण चिके. पंचायत समिती मतदार संघ हरकुळ बुद्रुक : प्रियांका प्रीतम मोर्ये, हरकुळ खुर्द: चंद्रहास जयवंत सावंत, खारेपाटण: अंजली सुधीर कुबल. वैभववाडी तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघ कोळपे: सुश्मिता सुनील कांबळे. पंचायत समिती मतदार संघ कोळपे: सीमा शरद नानिवडेकर, लोरे: लक्ष्मण पुरुषोत्तम रावराणे. देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघ कुणकेश्वर: संजीवनी संजय बांबूळकर, किंजवडे: मनस्वी महेश घारे, शिरगाव: मानसी शैलेंद्र जाधव, बापार्डे: सीमा सुहास नाईक धुरे, पडेल: गणेश सदाशिव राणे. पंचायत समिती मतदार संघ मुणगे: सुनील बाळकृष्ण पारकर, किंजवडे: प्राजक्ता पांडुरंग घाडी, कोटकामते: सदाशिव पुरुषोत्तम ओगले, तळवडे: नारायण यशवन्त जाधव, फणसगाव: जयश्री जयवंत आडीवरेकर, बापार्डे: विवेक विठ्ठल वेद्रुक, पडेल: पूर्वा विवेक तावड़े, पुरळ: रविंद्  राजाराम तिर्लोटकर .
       मालवण तालुक्यातील जिल्हापरिषद मतदारसंघ आचरा: बापूजी दामोदर पडवळ, पेंडुर: संतोष कृष्णा लुड़बे, आडवली- मालडी: अरुण वसंत मेस्त्री. पंचायत समिती मतदारसंघ आचरा: साक्षी समीर ठाकुर, चिन्दर: प्रकाश दिनकर मेस्त्री, वराड: रमेश सहदेव बांदिवडेकर, सुकळवाड़: वीरेश मधुकर पवार, पोईप: अनीता अभिमन्यू गावडे.
      सावंतवाड़ी तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघ आंबोली: सुषमा अंकुश गावडे, कोलगाव: महेश रमेश सारंग, तळवडे: शंकर संभाजी साळगावकर, माजगाव: हेलन लक्ष्मण निब्रे, इन्सुली: सुविधा मंगेश पेडणेकर, बांदा : श्वेता दिलीप कोरगावकर, माडखोल: सुहासीनी सयाजी पवार.
     दोडामार्ग तालुका जिल्हा परिषद मतदार संघ साटेली- भेडशी: स्मिता यशवंत आठलेकर, माटणे: राजेंद्र दत्ताराम म्हापसेकर, मणेरी: आकांक्षा महिंद्र शेटकर.
     कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघ नेरुळ: चारुदत्त देसाई, पावशी: दयानंद अणावकर.
     वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हापरिषद मतदारसंघ आडेली: श्रध्दा संतोष शिरोडकर. पंचायत समिती मतदार संघ वायंगणी : स्मिता मिलिंद दामले . यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
 
दुसरी यादी आज जाहिर करणार!
भाजपची दूसरी उमेदवार यादी शुक्रवारी जाहिर करण्यात येणार असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले.
 

 

Web Title: BJP announces first list of candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.