भाजप कोकणवर राग काढतोय

By admin | Published: August 30, 2015 12:26 AM2015-08-30T00:26:45+5:302015-08-30T00:28:45+5:30

परशुराम उपरकर : केमिकल झोनला मनसेचा विरोधच

BJP is annoying anger on the Konkan | भाजप कोकणवर राग काढतोय

भाजप कोकणवर राग काढतोय

Next

सावंतवाडी : कोकणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा होऊनसुद्धा एकही उमेदवार निवडून आला नाही. याचा राग सध्या भाजप सरकार काढत असल्यानेच त्यांनी कोकणात केमिकल झोन आणण्याचा घाट घातला आहे. त्याला मनसेचा तीव्र विरोध असून प्रसंगी रस्त्यावर उतरून विरोध करू, असा इशारा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, बाबुराव गावडे, दत्ताराम गावकर, श्रेया देसाई, अभिमन्यू गावडे आदि यावेळी उपस्थित होते. उपरकर म्हणाले, कोकण हा निसर्गदृष्ट्या संपन्न आहे. या ठिकाणी फलोत्पादनासारखे प्रकल्प आणणे गरजेचे आहे. मात्र ते न आणता केमिकल झोनसारखे प्रकल्प आणण्याचे काम सुरू आहे. यांची माहिती सरकारमधील उद्योग व पर्यावरण मंत्री यांनासुद्धा नाही. मग भाजप सरकार निवडणुकीतील राग काढत आहे का? असा सवाल करीत विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोकणात शेवटच्या दिवशी दोन सभा झाल्या. मात्र, एक सुद्धा उमेदवार निवडून आला नाही. यामुळे भाजप बिथरली असून ते पर्यावरण बाधक प्रकल्प आणून राग व्यक्त करीत आहेत. हे कदापि आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
युती सरकारमध्ये दीपक केसरकर हे मंत्री असून या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तेही या विषयावर काहीही भाष्य करीत नाहीत मग त्यांना हा झोन हवा आहे का? अशी शंका येत आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. (प्रतिनिधी)

Web Title: BJP is annoying anger on the Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.