पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द, भाजपने कणकवलीत पुतळा जाळून केला निषेध

By सुधीर राणे | Published: December 17, 2022 12:18 PM2022-12-17T12:18:13+5:302022-12-17T12:20:36+5:30

आमदार नितेश राणे यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले

BJP burnt effigy of Pakistan's foreign minister in Kankavli to protest against PM Modi use of abusive language | पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द, भाजपने कणकवलीत पुतळा जाळून केला निषेध

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द, भाजपने कणकवलीत पुतळा जाळून केला निषेध

Next

कणकवली: पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्याविरोधात कणकवली तालुका भाजपाच्यावतीने बिलावल भुट्टो जरदारींचा पुतळा जाळत निषेध नोंदवला. यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बिलावल भुट्टो जरदारींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है, हमसो जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा 'अशा जोरदार घोषणा देत बिलावल भुट्टो यांचा निषेध करण्यात आला. आमदार नितेश राणे यांनी स्वतः या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

यावेळी  माजी आमदार प्रमोद जठार, शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, शहराध्यक्ष प्राची कर्पे, युवा मोर्चाचे गणेश तळगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: BJP burnt effigy of Pakistan's foreign minister in Kankavli to protest against PM Modi use of abusive language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.