मालवणच्या विकासासाठी भाजप शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

By admin | Published: April 3, 2015 09:16 PM2015-04-03T21:16:29+5:302015-04-04T00:14:22+5:30

बाबा मोंडकर : सत्ताधारी काँग्रेस कामे करण्यास अपयशी

BJP delegation will meet the chief minister for the development of Malvan | मालवणच्या विकासासाठी भाजप शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

मालवणच्या विकासासाठी भाजप शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

Next

मालवण : शहरवासीयांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी भाजपचे एक शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, असे प्रतिपादन बाबा मोंडकर यांनी केले. मालवण नगरपालिकेच्या यापूर्वी झालेल्या सभेत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याविषयीचा ठराव झाला. या पार्श्वभूमीवर मालवण भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुनील मोंडकर, भाऊ सामंत, विलास हडकर, दादा वाघ, सुरेश मसुरकर, गणेश कुशे, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर, बबन परुळेकर, आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना मोंडकर म्हणाले, पंधरा दिवसांपूर्वी सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात मालवणचे राष्ट्रवादी पुरस्कृत माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी पर्यावरणमंत्र्यांची भेट घेऊन सीआरझेडमुळे बांधकाम करण्यास अडचणी येत आहेत, असे गाऱ्हाणे मांडले होते. यावर राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत या विषयावर मार्ग काढण्यासाठी बैठक घेतली व मालवणच्या मुख्याधिकाऱ्यांना पर्यावरणमंत्र्यांनी मालवण पालिकेने सरकारकडे वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा व त्यावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते. असे असताना लोकसेवक म्हणविणारे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर स्थानिक जनतेच्या विरोधात आक्रमक होतात, हे चुकीचे आहे. वस्तुत: सिंधुदुर्ग किल्ल्यामुळे मालवण शहराला दरवर्षी सुमारे ६ लाख पर्यटक भेट देतात. परंतु, मालवण नगरपालिका मासिक सभेत शहरातील अन्य प्रलंबित गोष्टींवर चर्चा करीत नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे, असे मोंडकर म्हणाले.
मोठा गाजावाजा करून कचऱ्यावर वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याचे पालिकेच्यावतीने सांगितले होते. परंतु, हा प्रकल्प गॅसनिर्मितीवरच करण्यात आला. यासाठी लागणारा कचरा उपलब्ध असूनदेखील ज्यांना कचरा उचलण्याचे टेंडर दिले, ते पूर्ण क्षमतेने उचलत नाहीत. (प्रतिनिधी)


पर्यटन निधीमधून चिवला बीच येथे वॉटरस्पोर्ट प्रकल्प चालू करण्यासाठी निधी खर्च केला व गेली कित्येक वर्षांची एकहाती सत्ता असूनही हे वॉटरस्पोर्ट चालू झाले नाही. तसेच त्याविषयी नियमावली बनवण्यास सत्ताधारी असमर्थ ठरले, अशी टीका करीत मोंडकर म्हणाले, शहरात बंद असलेल्या स्ट्रीटलाईटचा प्रश्न गंभीर आहे.
भुयारी गटार योजनेचे काम चालू आहे. या कामातील चेंबरच्या बांधकामावर पाणी मारले जात नाही. लाखो रुपये खर्च करून आणलेला जनरेटर व पुढे लागणारे सामान धूळ खात पडले आहे. याचीही या सत्ताधारी नगरसेवकांना फिकीर नाही. असे कित्येक प्रश्न शहरात प्रलंबित आहेत.
यावर सत्ताधारी नगरसेवक लक्ष देत नाहीत. म्हणूनच मालवण नगरपालिकेच्या प्रलंबित प्रश्नासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे, अशी माहिती बाबा मोंडकर यांनी दिली.

Web Title: BJP delegation will meet the chief minister for the development of Malvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.