दोडामार्ग तालुक्यातील दोन्ही सरपंच पदावर भाजपचे वर्चस्व; श्रुती देसाई, प्रविण गवस विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 01:54 PM2022-10-17T13:54:37+5:302022-10-17T14:39:54+5:30
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले अभिनंदन
दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : दोडामार्ग तालुक्यातील झरे – २ व पाटये पुनर्वसन या दोन ग्रामपंचयातच्या निवडणुका रविवारी पार पाडल्या होत्या. यामध्ये सरपंच पदी झरे-२ मधून श्रुती देसाई हया ८६ मतांनी निवडून आल्या. तर पाटये पुनर्वसन सरपंच पदी प्रविण गवस हे २१ मतांनी निवडून आले.चुरशीच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.
तहसील कार्यालया समोर सूक्ष्म लघु मध्यम केंद्रिय उद्योगमंत्री नारायणराव राणे भाजपा कार्यकर्ते व नूतन सरपंच यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.दोन्ही गाव तिलारी आंतर राज्य प्रकल्प बाधीत गावाचे पुनवर्सन क्षेत्रातील असून या ठिकाणच्या या ग्रा. पं. निवडणुकीसाठी थेट सरपंच व सदस्य पदासाठी रविवारी मतदान प्रक्रिया पुर्ण झाली होती. यापूर्वी झरे २ मधील प्रभाग तर पाटये पुनर्वसनमध्ये केवळ एक सर्वसाधारण स्त्री सदस्य बिनविरोध निवडुन आली होती.
झरे २ ग्रा. पं. अंतर्गत थेट सरपंच पदासाठी श्रुती विठ्ठल देसाई ( सरगवे पुनर्वसन ) ३३१मते व रंजना विष्णू सावंत ( आयनोडे पुनर्वसन )२४५ मते व हे दोन सर्वसाधारण स्त्री उमेदवार यांच्यात लढत झाली होती. त्यात श्रुती देसाई निवडून आल्या. पाटये ग्रामपंचायत सासोली खुर्द येथे थेट सरपंच पदासाठी प्रविण गवस हे २१ मतांनी विजयी झाले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"