'कनेडी पॅटर्न राबवायचा असेल तर आमची देखील तयारी; इलाका भी हमारा, धमाका भी हमाराच'
By सुधीर राणे | Published: February 18, 2023 01:55 PM2023-02-18T13:55:45+5:302023-02-18T13:57:01+5:30
बाळासाहेब ठाकरे हे आज जिथे कुठे असतील त्यांना निश्चितच आनंद झाला असेल
कणकवली : बाळासाहेब ठाकरे हे आज जिथे कुठे असतील त्यांना निश्चितच आनंद झाला असेल. त्यांचा मुलगा व नातवाने जे त्यांचे नाव धुळीस मिळवायचे काम केले, त्या दोघांना देखील ही आज चपराक बसली असल्याचा टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी लगावला.
कनेडी पॅटर्न राबवणार या राऊत यांच्या इशाऱ्यावर देखील राणे यांनी त्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, कनेडी पॅटर्न राबवायचा असेल तर आमची देखील तयारी आहे. 'इलाका भी हमारा और धमाका भी हमारा' असे सांगत सुरुवातीलाच उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर मिश्किल हसून टोला मारत शिवसेनेच्या त्या टॅग लाईनला उत्तर दिले. मात्र, आम्हाला जिल्ह्यात शांतता हवी आहे. असे देखील ते म्हणाले.
राज्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजपाची युती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतल्यानंतर योगायोगाने कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात खासदार संजय राऊत यांची कॉर्नर सभा झाली. त्याच चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्यासह फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार जल्लोष केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, शिशिर परुळेकर, विराज भोसले, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, आशिये सरपंच महेश गुरव, पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे, कलमठ उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, प्रज्वल वर्दम, बबलू सावंत, अजय गांगण, बाबू गायकवाड, किशोर राणे, तेजस लोकरे, राजा पाटकर, विजय चिंदरकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.