नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 03:13 PM2022-01-28T15:13:15+5:302022-01-28T15:14:25+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आमदार नितेश राणे शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर
सिंधुदुर्ग : सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आमदार नितेश राणे शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयात आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात ही सुनावणी घेण्यात आली.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आ. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर आ नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात प्राथमिक सुनावणी होत न्यायालयाने याबाबत सोमवारी ३१ जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आ राणे यांना अटक होणार की नाही? याबाबतचे चित्र सोमवारी स्पष्ट होणार आहे