संपूर्ण लॉकडाऊनला भाजपचा विरोधच  :प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 05:12 PM2021-03-31T17:12:31+5:302021-03-31T17:14:06+5:30

BJP PramodJathar Sindhudurg-ठाकरे सरकारचे सर्वच आघाड्यांवरील नियोजन आता फसलेले आहे. महाविकास आघाडीला सरकार चालविण्यात अपयश आले आहे, तर मंत्र्यांवर ताबा नसल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा विचार मुख्यमंत्री करीत आहेत. मात्र, गरिबाने रस्त्यावर येऊन काम केल्याशिवाय त्याची चूल पेटत नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन झाल्यास भाजपचा त्याला पूर्णतः विरोध असेल, असे भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी येथे स्पष्ट केले.

BJP opposes complete lockdown: Pramod Jathar | संपूर्ण लॉकडाऊनला भाजपचा विरोधच  :प्रमोद जठार

संपूर्ण लॉकडाऊनला भाजपचा विरोधच  :प्रमोद जठार

Next
ठळक मुद्देसंपूर्ण लॉकडाऊनला भाजपचा विरोधच  :प्रमोद जठार महाविकास आघाडीला सरकार चालविण्यात अपयश

कणकवली : ठाकरे सरकारचे सर्वच आघाड्यांवरील नियोजन आता फसलेले आहे. महाविकास आघाडीला सरकार चालविण्यात अपयश आले आहे, तर मंत्र्यांवर ताबा नसल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा विचार मुख्यमंत्री करीत आहेत. मात्र, गरिबाने रस्त्यावर येऊन काम केल्याशिवाय त्याची चूल पेटत नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन झाल्यास भाजपचा त्याला पूर्णतः विरोध असेल, असे भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी येथे स्पष्ट केले.

कणकवली येथील भाजप कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बबलू सावंत उपस्थित होते. प्रमोद जठार म्हणाले, लॉकडाऊन लागू झाला तर सर्वसामान्य, गोरगरीब आणि हातावर पोट असलेल्या कुटुंबांना उपाशी मरावे लागणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनला विरोध करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. तसेच लॉकडाऊन लागू केले तर आम्ही रस्त्यावर उतरूनही आंदोलन करणार आहोत. सरकारला जर लॉकडाऊन करायचाच असेल तर त्यांनी आधी गोरगरिबांच्या खात्यामध्ये महिन्याला किमान १० हजार रुपये जमा करावेत. त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी. त्यानंतरच लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा, असेही जठार म्हणाले.

राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मूळ भाजपवासीयांना किंमत राहिलेली नाही, असे म्हणणारा कणकवलीतील युवा नेता आता शिवसेनेची साथ सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे त्याने आम्हांला निष्ठा शिकवू नये, असा टोला संदेश पारकर यांचे नाव न घेता जठार यांनी लगावला.

भाजपमध्ये जुने-नवीन वाद नाहीत

खासदार नारायण राणे हे आमचे भाजपचे नेते आहेत. ते भाजपवासी झाल्यानंतर राणेसमर्थक जिल्हा परिषद अध्यक्ष तर उपाध्यक्ष हा मूळ भाजपचा होईल, त्याचप्रमाणे चारही विषय समिती सभापती राणे समर्थक जिल्हा परिषद सदस्य होतील, असे ठरले होते. सभापती निवडीचे अधिकारही राणेंनाच आहेत. राष्ट्रवादीच्या अनिषा दळवी यांना सभापतीपद देण्यामागे राणेंची पुढील रणनीती आहे. त्या रणनीतीतून अनेकांची शिकार झालेली येत्या निवडणुकीत दिसून येईल. राणे यांनी धक्कातंत्र वापरून महाविकास आघाडीचा सदस्य फोडून त्यांनाच धक्का दिला आहे.

Web Title: BJP opposes complete lockdown: Pramod Jathar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.