शेर्ले येथे कोरोना सेंटर केल्यास भाजपाचा विरोध, सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 06:01 PM2020-07-24T18:01:40+5:302020-07-24T18:03:24+5:30

कोविड सेंटर हे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणीच हलविण्यात यावे. अन्यथा भाजपकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बांदा भाजप मंडलाच्यावतीने देण्यात आला आहे.

BJP opposes setting up of Corona Center at Sherley, statement to Sawantwadi tehsildar | शेर्ले येथे कोरोना सेंटर केल्यास भाजपाचा विरोध, सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन

शेर्ले येथे कोरोना सेंटर केल्यास भाजपाचा विरोध, सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन

googlenewsNext
ठळक मुद्देशेर्ले येथे कोरोना सेंटर केल्यास भाजपाचा विरोध, सावंतवाडी तहसीलदारांना निवेदनबांदा मंडलाच्यावतीने आंदोलनाचा इशारा, रुग्णांसाठी अडगळीची जागा

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले गावात यापूर्वी बाहेर गावातून येणाऱ्या लोकांसाठी क्वारंटाईन सेंटर चालू केले आहे. मात्र, आता कोरोना बाधित असलेल्या रुग्णांसाठी क्वारंटाईन सेंटरचे प्रशासन कोविड सेंटर करीत असल्यास त्याला आमचा विरोध राहील.

कोविड सेंटर हे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणीच हलविण्यात यावे. अन्यथा भाजपकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बांदा भाजप मंडलाच्यावतीने देण्यात आला आहे.

याबाबतचे निवेदन सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी, पंचायत समितीच्या सभापती मानसी धुरी, जिल्हा परिषद सदस्या उन्नती धुरी, मधुकर देसाई, विकास केरकर आदींनी दिले. यात आपण लक्ष घालून योग्य तो मार्ग काढू, असे आश्वासन तहसीलदार म्हात्रे यांनी दिले.

सावंतवाडी तालुक्याचे कोविड सेंटर हे तालुक्यातील सर्व गावांचा विचार करता फारच अडगळीच्या व वाहतुकीच्या दृष्टीने क्लिष्ट अशा ठिकाणी आहे. शेर्ले पंचक्रोशीतील सर्व गावांच्या सरपंचांचा अर्थातच ग्रामस्थांचाही या कोविड सेंटरला तीव्र विरोध असून तो लेखी स्वरुपात आपल्यापर्यंत पोहोचला असताना त्याच जागेत हे कोविड सेंटर होण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून घातला जाणारा घाट हा अनपेक्षित आहे. याकरिता भाजपकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

कोविड सेंटरसाठी प्रशासकीय पातळीवर घाट

सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले गावात यापूर्वी बाहेर गावातून येणाºया लोकांसाठी क्वारंटाईन सेंटर चालू केले आहे. मात्र, आता कोरोना बाधित असलेल्या रुग्णांसाठी क्वारंटाईन सेंटरचे प्रशासन कोविड सेंटर करीत असल्याचे समजते. हे निर्धारित कोविड सेंटर हे तालुक्यातील सर्व गावांचा विचार करता फारच अडगळीच्या व वाहतुकीच्या दृष्टीने क्लिष्ट अशा ठिकाणी आहे.

शेर्ले पंचक्रोशीतील सर्व गावांच्या सरपंचाचा अर्थातच ग्रामस्थांचाही या कोविड सेंटरला तीव्र विरोध असून तो लेखी स्वरुपात आपल्यापर्यंत पोहोचला आहे. त्याच जागेत हे कोविड सेंटर होण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून घातला जाणारा घाट हा दुर्दैवी व अनपेक्षित आहे, असेही म्हटले आहे.

Web Title: BJP opposes setting up of Corona Center at Sherley, statement to Sawantwadi tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.