..तर दीपक केसरकरांच्या कुंडल्या बाहेर काढू, भाजप प्रवक्ते संजू परबांचा इशारा 

By अनंत खं.जाधव | Published: April 12, 2023 04:52 PM2023-04-12T16:52:40+5:302023-04-12T16:55:27+5:30

केसरकारांना जनाची नाही, पण मनाची असेल तर त्यांनी युतीची भाषा करू नये

BJP spokesperson Sanju Parab's warning to Minister Deepak Kesarkar | ..तर दीपक केसरकरांच्या कुंडल्या बाहेर काढू, भाजप प्रवक्ते संजू परबांचा इशारा 

..तर दीपक केसरकरांच्या कुंडल्या बाहेर काढू, भाजप प्रवक्ते संजू परबांचा इशारा 

googlenewsNext

सावंतवाडी : काही झाले तरी मोती तलावा काठचा आठवडा बाजार हलवू देणार नाही, तसा प्रयत्न मंत्री दीपक केसरकर यांनी केल्यास त्यांच्या कुंडल्या बाहेर काढू, असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी दिला. दरम्यान मंत्री केसरकरांनी एवढा अपमान होऊन आमच्या बरोबर युती करण्यास येऊ नये पाठिंब्याशिवाय आम्ही पालिका ताब्यात घेण्यास सक्षम आहोत. त्यांची आम्हाला गरज नाही, असेही स्पष्टच सुनावले. 

परब यांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत मंत्री केसरकर यांच्यावर टीका केली. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, नासिर शेख, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना परब म्हणाले, येथील मोती तलावा काठी भरविला जाणारा आठवडा बाजार योग्यच आहे. त्याला नागरिकांची सुद्धा ना हरकत आहे. बऱ्याच नागरिकांनी हा आठवडा बाजार इतरत्र हलवू नये, अशी मागणी केली आहे. मात्र केसरकर सवयीप्रमाणे आपलं तेच खरं करण्याचा बालिश हट्ट करत असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यांनी आठवडा बाजार हलवून दाखवावाच, त्यांच्या कुंडल्या बाहेर काढू, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

सावंतवाडी पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे. त्यामुळे केसरकारांना जनाची नाही, पण मनाची असेल तर त्यांनी युतीची भाषा करू नये, त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही पालिका ताब्यात घेऊन दाखवतो, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

तेलींबद्दल बोलल्यास खपवून घेणार नाही

राजन तेली भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. कोण उठेल आणि टीका करेल तर आम्ही गप्प बसणार नाही. मंत्री केसरकर यांनी निधी आणला तर मल्टीस्पेशालिटी रूग्णालय तसेच उद्योग या जिल्ह्यात का आले नाही? नागरिक आता भूलथापांना बळी पडणार नाहीत. 

व्यापाऱ्यांना मोती तलावा काठी बाजार हवा

जरी काही व्यापाऱ्यांकडून मोती तलावावर बाजार नको असे निवेदन देण्यात आले असले तरी ते त्याचे व्यक्तीगत मत असू शकते. पण आम्हा सर्व व्यापाऱ्यांना मोती तलावा कठीच बाजार हवा असल्याचे व्यापारी संघटना प्रतिनिधी आनंद नेवगी यांनी सांगितले.

Web Title: BJP spokesperson Sanju Parab's warning to Minister Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.