भाजपचे तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 11:55 PM2017-09-06T23:55:41+5:302017-09-06T23:55:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कुडाळ : भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांना सहा वर्षांसाठी भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे. पक्षशिस्तविरोधी कार्यवाही केल्याने भाजपच्या कोअर कमिटीने त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, पुतळा दहनाच्या प्रकरणानंतर पक्षश्रेष्ठींनी याबाबता निर्णय कोअरकमिटी घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गणेशोत्सव संपल्यानंतर लगेचच भाजप कोअर कमिटीची बैठक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि सतीश धोंड तसेच जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी मालवणच्या प्रश्नावर चर्चा झाली. मोंडकर यांनी केलेले वर्तन पक्षशिस्तीविरुद्ध असल्याचे एकमत झाले व त्यांच्यावर कारवाई करण्याच्या निर्णयावर एकमत झाल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. त्यानुसार मोंडकर यांना सहा वर्षांसाठी भाजपमधून निलंबित करण्यात आल्याचे चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल
विजय केनवडेकर नवे तालुकाध्यक्ष
मोंडकर यांच्या वर्तनावर पांघरूण घातले असते तर तो निर्णय पक्षशिस्तीसाठी बाधक ठरला असता. त्यामुळे मोंडकर यांच्यावर कारवाई केल्याचे स्पष्ट करीत मंत्री चव्हाण यांनी मोंडकर यांच्या जागी तालुकाध्यक्षपदी केनवडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
पुतळा दहन खटकले
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी तडकाफडकी बाबा मोंडकर यांच्या जागी विजय केनवडेकर यांची मालवण तालुकाध्यक्षपदी निवड केल्याने वाद उफाळला होता. त्यानंतर मोंडकर यांनी जठारांच्या विरोधात रान उठविले होते. जिल्हाध्यक्ष या नात्याने जठारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचेही दहन केले होते. पुतळा दहनाची बाब भाजप पक्षश्रेष्ठींना जास्त खटकली होती.