नानिवडेतील भाजपा कार्यकर्ते शिवसेनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 06:05 PM2020-12-21T18:05:29+5:302020-12-21T18:07:05+5:30

Politics sindhudurg news- नानिवडे येथील ६० हून अधिक भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सावंत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून नानिवडे गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अभिवचन कार्यकर्त्यांना दिले.

BJP workers from Naniwade join Shiv Sena | नानिवडेतील भाजपा कार्यकर्ते शिवसेनेत

नानिवडेतील भाजपा कार्यकर्ते शिवसेनेत

Next
ठळक मुद्देनानिवडेतील भाजपा कार्यकर्ते शिवसेनेतशिवसेनेच्या माध्यमातून नानिवडे गावाचा सर्वांगीण विकास

वैभववाडी : नानिवडे येथील ६० हून अधिक भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सावंत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून नानिवडे गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अभिवचन कार्यकर्त्यांना दिले.

नानिवडे वाडेकरवाडी येथील दीपक साळवी आणि प्रवीण वाडेकर यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे संदेश पटेल, स्वप्नील धुरी, अशोक रावराणे, सुरेश पांचाळ, बाबा मोरे, बाबा खाड्ये, पप्या पालांडे, अतुल सरवटे, सूर्यकांत महाजन आदी उपस्थित होते.
भाजपाचे दीपक साळवी, प्रवीण वाडेकर, सिद्धेश साळवी, दत्ताराम जाधव, हरी वाडेकर, सुरेश साळवी, गोविंद वाडेकर, राम गावडे, बाळकृष्ण साळवी, आरती गावडे, वंदना साळवी, सुनंदा गोरूले, वासंती शिवगण, प्रभावती वाडेकर यांच्यासह साठहून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे कार्यकर्ते घराघरात निर्माण होणे आवश्यक आहेत. त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करा. नानिवडे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या माध्यमातून यापुढील काळात प्रयत्न केला जाणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम केले जाईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेच्या कामाला सुरुवात करावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

सिंधु फोटो ०१
नानिवडे येथील भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Web Title: BJP workers from Naniwade join Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.