तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविणार : नासीर काझी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 06:51 PM2021-01-01T18:51:29+5:302021-01-01T18:53:21+5:30

gram panchayat Election Bjp Sindhudurg- निवडणूक होण्यापूर्वीच भाजपचे २८ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, मांगवली आणि वेंगसर या दोन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. निवडणुकीपर्यंत भाजपचा आलेख चढताच राहणार असून, तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी व्यक्त केला.

BJP's flag to be hoisted on 13 Gram Panchayats: Nasir Qazi | तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविणार : नासीर काझी

तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविणार : नासीर काझी

Next
ठळक मुद्देतेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविणार : नासीर काझी मांगवली, वेंगसर ग्रामपंचायतींवर केला दावा

वैभववाडी : निवडणूक होण्यापूर्वीच भाजपचे २८ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, मांगवली आणि वेंगसर या दोन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. निवडणुकीपर्यंत भाजपचा आलेख चढताच राहणार असून, तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी व्यक्त केला.

येथील भाजप कार्यालयात त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, किशोर दळवी, अनंत फोंडके आदी उपस्थित होते.

काझी म्हणाले, तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. परंतु निवडणूक निकालापूर्वीच भाजपच्या विजयाची श्रुंखला सुरू झाली आहे. तालुक्यातील १०३ पैकी २८ जागा बिनविरोध आल्या असून, त्या भाजपच्या आहेत. मांगवली ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली असून ती भाजपच्या ताब्यात आली आहे.

वेंगसर ग्रामपंचायतीच्या सातपैकी सहा जागांची निवड बिनविरोध झाली असून, त्या सर्व जागा भाजपच्या आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच दोन ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे. निवडणूक अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जानेवारी असून, त्या तारखेपर्यंत भाजपच्या आणखी काही जागा बिनविरोध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उर्वरित ११ ही ग्रामपंचायतींवर येत्या काळात भाजपचेच वर्चस्व दिसून येणार आहे.

पक्षाच्या लोकाभिमुख धोरणामुळे विरोधी पक्षात काम करणाऱ्या अनेकांना भाजपचे आकर्षण आहे. निवडणुकीला इतर पक्षातून उभे राहिलेले अनेक कार्यकर्ते पक्षात प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. परंतु आमच्या पक्षाचे पॅनेल त्या गावात असल्यामुळे तूर्तास त्यांचा प्रवेश घेण्यास अडचण झालेली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

धमक्यांना घाबरत नाही

काही गावांमध्ये उमेदवारी अर्ज भरणाऱ्या महिला उमेदवारांना विरोधकांकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे धमक्या देणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दिली जाणार आहे. आम्ही कुणाच्याही धमक्यांना भीक घालत नाही. कारण आमचे नेतृत्व सक्षम आहे, असे मत नासीर काझी यांनी व्यक्त केले.

Web Title: BJP's flag to be hoisted on 13 Gram Panchayats: Nasir Qazi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.