भाजपचे मिशन ‘बेनामी ठेकेदार मुक्त जिल्हा’

By admin | Published: July 3, 2016 11:25 PM2016-07-03T23:25:30+5:302016-07-03T23:25:30+5:30

काका कुडाळकर : विकासाच्या नावाखाली निकृष्ट कामे ; मालवण येथे निवडणूक आढावा बैठक

BJP's mission 'Anonymous contractor free district' | भाजपचे मिशन ‘बेनामी ठेकेदार मुक्त जिल्हा’

भाजपचे मिशन ‘बेनामी ठेकेदार मुक्त जिल्हा’

Next

 मालवण : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये युती शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली निकृष्ट कामे करत स्थानिक सत्ताधाऱ्यांनी गैरकारभार केला आहे. भाजपच्या माध्यमातून गैरप्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असून बेनामी ठेकेदारांपासून जिल्हा मुक्त करण्याचे मिशन हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती भाजपा जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर यांनी दिली.
मालवण येथील भाजप कार्यालयात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच पालिका निवडणुकांबाबत आढावा बैठक काका कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुहास सावंत, राजू राऊळ, प्रभाकर सावंत, मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा चिटणीस आप्पा लुडबे, भाऊ सामंत, अविनाश पराडकर, शहर अध्यक्ष बबलू राऊत, रविकिरण तोरसकर, महेश मांजरेकर, गोपी पालव, सर्फराज नाईक, गणेश कुशे, धोंडी चिंदरकर, संतोष गावकर, पूर्वा ठाकूर, गजानन ठाकूर, कमलेश चव्हाण, विरेश पवार, शशिकांत शिंदे, मनोज मोंडकर आदी उपस्थित होते.
यावेळी भाजपा तालुका कायदेविषयक आघाडी प्रमुख पदी वकील हेमेंद्र गोवेकर यांची नियुक्ती करण्यात आली. गोवेकर यांचा अनुभव व कायदेविषयक ज्ञानाचा पक्ष व कार्यकर्त्यांना निश्चितच उपयोग होईल, असे तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी सांगितले. तर शहर व तालुक्याची किनारपट्टी सीआरझेड क्षेत्रातील सीव्हीसीएमधून मुक्त करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा दौरा लवकरच निश्चित केला जाईल, असे त्यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)
पालिका निवडणुकीत परिवर्तन घटविणार
पालिका निवडणुकीत भाजपाकडून सतराही जागावर निवडणूक लढवली जाणार आहे. तालुक्यातही तालुका भाजपकडून चांगले काम झाले आहे. पालिका निवडणुकीचा विचार करता विद्यमान सत्ताधारी काँग्रेसकडून सत्ता काढून घेण्याचे आमचे मिशन आहे. सध्या कार्यरत असलेल्या विशिष्ट गटाने शहरात अपेक्षित विकास झाला नाही. त्यामुळे मालवणची जनता नवा पर्याय शोधत आहे. उत्तम पर्याय म्हणून भाजप सक्षम आहे. जनतेचा विश्वास संपादन करून जनताच मालवणचे नेतृत्व ठरवेल. या पालिका निवडणुकीत मालवणात परिवर्तन घडून येईल, असा विश्वास कुडाळकर यांनी व्यक्त केला.

Web Title: BJP's mission 'Anonymous contractor free district'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.