समुद्रकिनाºयावर काळ्या रंगाच्या तेलाचे मिश्रण -: मच्छिमार -पर्यटकांना हानीकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 06:34 PM2019-04-04T18:34:12+5:302019-04-04T18:35:04+5:30
कोकण किनारपट्टीवर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केल्याने समुद्राचे निळेशार पाणी, पांढरी शुभ्र वाळू व स्वच्छ सुंदर किनारे यांची पर्यटकांना भुरळ पडली आहे. त्यामुळे सहाजिकच वर्षभर जिल्ह्यातील किनारपट्टीवर पर्यटकांचा ओढा असतो. पर्यायाने जिल्ह्यातील पर्यटन
सावळाराम भराडकर ।
वेंगुर्ले : कोकण किनारपट्टीवर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केल्याने समुद्राचे निळेशार पाणी, पांढरी शुभ्र वाळू व स्वच्छ सुंदर किनारे यांची पर्यटकांना भुरळ पडली आहे. त्यामुळे सहाजिकच वर्षभर जिल्ह्यातील किनारपट्टीवर पर्यटकांचा ओढा असतो. पर्यायाने जिल्ह्यातील पर्यटन वाढीस बळ येथील नयनरम्य समुद्रकिनारे देतात. मात्र सध्या किनाºयावरील वाळूवर काळ्या रंगाचे तेल मिश्रित गोळ्यांचे थर साचल्याने तसेच कचºयाचे साम्राज्य पसरल्याने शुभ्र वाळूच्या किनारपट्ट्या काळ्याकुट्ट व अस्वच्छ होत असून ही गंभीर बाब मच्छीमारी बरोबरच पर्यटनासाठी अधिक मारक ठरत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या विकसित होत असताना जिल्ह्यातील आकर्षक सागर किनारे, निळेशार स्वच्छ पाणी, किनाºयांवर पसरलेला शुभ्र वाळूंचा थर देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करतो. जिल्ह्याला लाभलेल्या या वरदानामुळे वर्षभर पर्यटक भेट देतात.
दरवर्षीच एप्रिल ते जून महिन्याच्या सुमारास समुद्रात जोरदार वाहणारे दक्षिण वारे लाटाबरोबर तेलाचा तवंग किनाºयावर घेवून येतात व तेलतवंगाचे लहान मोठे गोळे वाळूवर पसरतात. ते वाळूला चिकटल्यामुळे त्याचे गोळे तयार झाले आहेत. हे गोळे चिकटमय असून ते मेणासारखे मऊ असतात.
त्यात कडाक्याच्या उन्हाने हे तेलमिश्रित गोळे वाळूत वितळून वाळूवर काळे थर जमा होतात. त्यामुळे स्वच्छ सुंदर असलेले सागरकिनारे काळेकुट्ट बनत आहेत. समुद्रातील तेल विहीरीतून तेल काढताना तसेच सागरीमार्गे तेलाची वाहतूक करताना मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची गळती समुद्रात होते. तर काही वेळा तेलाची वाहतूक करताना जहाजांना जलसमाधी मिळते. तसेच निकृष्ट तेल समुद्रात फेकले जाते. तर मोठ्या नौकांच्या देखभाल दुरूस्तीसाठी आॅइलचा वापर करून ते तेल समुद्रात फेकून दिले जाते. पाण्यावर तेल तरंगत असल्याने ते लाटांच्या प्रवाहा बरोबर किनाºयाकडे येते. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असून समुद्रातील अतिरिक्त तेल गळतीमुळे किनाºयांवर वाळूमिश्रीत तेलाचे गोळे तयार होतात.
यामुळे मासेही मृतावस्थेत किनाºयावर आढळून येतात, असा स्थानिक मच्छिमारांचा अंदाज आहे. याबाबत पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग, मेरीटाइम बोर्ड दुर्लक्ष करत आहेत. अशा किनारपट्टीवर चालताना तेलमिश्रित चिकट गोळे पर्यटकांच्या पायाला तर मच्छिमारांच्या जाळ्यांना तसेच दोरखंडाला चिकटल्याने जाळी व दोरखंड खराब होतात.
स्वच्छता मोहिम राबवावी
दक्षिणी वाºयामुळे समुद्रातील मानवनिर्मित कचरा म्हणजेच पाण्याच्या प्लास्टिक बॉटल, चप्पल, प्लास्टिक पिशव्या, कापड, लाकडाचे ओंडके याच बरोबर तेल मिश्रित तवंग किनाºयांवर येऊन सागर किनारे अस्वच्छ बनत आहेत. त्यामुळे समुद्र किनाºयांवरील स्वच्छता ही महत्वाची बाब आहे. त्यासाठी शासनाने कृती कार्यक्रम हाती घेऊन सागर किनारे स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे.
वायंगणी किनाºयावर गेल्या आठ दिवसांपासून दक्षिणी वाºयाच्या झुळकेने समुद्रात तरंगत असलेले प्लास्टिक, मृत प्राण्यांचे अवयव, तेलाचे तवंग पाण्याच्या लाटांबरोबर किनाºयावर येतात. हे डांबर सदृश्य तेल तवंग वाळूला चिकटल्यामुळे त्याचे गोळे तयार होतात. हे तेलमिश्रित गोळे मच्छीमारांच्या जाळी, दोरखंड, मासेमारीच्या इतर साधनांना चिकटून मासेमारीची साधने खराब होतात. या तेलमिश्रित पाण्याच्या प्रादुर्भावाने मासेही मरून किनाºयाला लागतात. मासे मिळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असताना आता दरवर्षीच वाळूवरील तेलमिश्रित गोळे मासेमारी साधनांचे नुकसान करत असल्याने मच्छीमार आर्थिक संकटात सापडत आहेत.
-सुहास तोरसकर, कासव मित्र, वायंगणी