सातारा-लोणंद मार्गावरील खड्ड्यांना काळ्या मातीचा मुलामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 04:29 PM2017-08-24T16:29:44+5:302017-08-24T16:52:58+5:30
वाठार स्टेशन : सातारा-लोणंद राज्यमार्गावर पावसाळ्यात जागोजागी पडलेल्या महाकाय खड्डे भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कोरेगाव यांनी मुरुमाऐवजी चक्क काळ्या मातीचा वापर करीत असल्याने हे खड्डे नक्की किती दिवस टिकणार, याबाबत प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
Next

सातारा लोणंद हा सर्वाधिक वाहतुकीचा राज्यमार्ग सध्या जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे खराब झाला आहे. हा रस्ता दुरुस्त व्हावा, अशी मागणी प्रवासी वाहतूकदार स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. मात्र, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग तात्पुरती मलमपट्टी करत या कामाकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष करत आहे.