रॅम्बोची झडप आणि चप्पलावर रक्ताचे डाग, ओवळीयेतील खुनात भावाचाच सहभाग 

By अनंत खं.जाधव | Published: May 2, 2023 07:14 PM2023-05-02T19:14:47+5:302023-05-02T19:29:46+5:30

श्वानाने एवढ्या ग्रामस्थांमध्ये अजित याच्यावर झडप घेतली

Bloodstains on Rambo's valve and slippers, the brother's involvement in the murders in the oval | रॅम्बोची झडप आणि चप्पलावर रक्ताचे डाग, ओवळीयेतील खुनात भावाचाच सहभाग 

रॅम्बोची झडप आणि चप्पलावर रक्ताचे डाग, ओवळीयेतील खुनात भावाचाच सहभाग 

googlenewsNext

सावंतवाडी :  तालुक्यातील ओवळिये येथील माजी उपसरपंच लवू रामा सावंत (वय-59) यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असून या खून प्रकरणी पोलीसांनी त्याचा सख्खा भाऊ अजित रामा सावंत (55) याला ताब्यात घेऊन मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. खुनाचा प्रकार सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आला होता.

दरम्यान घटनेनंतर खुन्याच्या शोधासाठी पोलीसांनी आणलेल्या रॅम्बो श्वानाने मयताच्या भावावर घातलेली झडप तसेच चप्पलावर मिळालेले रक्ताचे डाग यावरून भाऊ अजित सावंत याला पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.

सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथील माजी उपसरपंच लवू  सावंत यांचा चिऱ्याच्या दगडाने ठेचून खून करण्यात आला असून हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. लवू सावंत हे आपल्या घरापासून अडीच किलोमीटरवर असलेल्या शेतमांगरात झोपण्यास गेले होते. त्यावेळी त्यांचा खून करण्यात आला. लवू यांचे धाकटे बंधू ग्रामपंचायत सदस्य अजित सावंत हे सकाळी शेतमांगराकडे गेले असता त्यांना ही घटना दिसली. त्यांनी भाऊ मृत्युमुखी पडल्याचे पाहिले त्यानंतर त्यांनी ही घटना गावात सांगितली.

घटनेनंतर ओवळिये येथे उपविभागीय पोलीस अधिकारी  रोहिणी साळुंके, पोलीस निरीक्षक फुलचंद  मेंगडे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा  तपासासाठी दाखल झाला.त्यांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली तसेच रॅम्बो हे श्वानपथकही मागविण्यात आले  मात्र, ते शेतमांगराभोवती घुटमळत होते. 

घटनेची माहिती ओवळिये गावासह पंचक्रोशीत समजतात परिसरात एकच गर्दी झाली हा प्रकार आर्थिक देवाण-घेवानीतून झाला की जमीन जागेच्या वादातून झाला याचा शोध पोलीस घेऊ लागले मात्र सावंत कुटुंबात कोणताही वाद नसल्याचे स्थानिक गावकऱ्यांनी सांगितले तसेच जमीन जागेवरूनही वाद कधी झाल्याचे गावात ऐकवत नसल्याचा निर्वाळा ग्रामस्थांनी पोलिसांकडे दिला.हे कुटुंब गेले अनेक वर्षांपासून एकत्रित राहात असतना असा प्रकार झालाच कसा असा प्रश्न आता गावकऱ्यांना पडला आहे.

दरम्यान पोलीसांनी सोमवारी दिवसभर पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन केले त्यानंतर मृतदेह मंगळवारी सकाळी कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला तर सोमवारी रात्री या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता मयत लवू यांचा भावावरच पोलीसांना संशय येऊ लागल्याने पोलीसांनी अजित सह अन्य एकाला ताब्यात घेऊन रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणले त्यानंतर त्यांच्याकडे सखोल चौकशी केली.असता भाऊ अजित याच्या विरोधात पोलीसांना ठोस पुरावे सापडल्याने चौकशीनंतर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

अजित याच्या अटकेनंतर गावात एकच खळबळ माजली या कुटूंबात कोणताही वाद नसताना हा प्रकार घडला कसा याचीच चर्चा गावात सुरू आहे. तिघेही भाऊ आपल्या कुटुंबासमवेत एकत्रच राहात होते.तसेच सर्वाची मुले चांगली नोकरीला असल्याचे ग्रामस्थांनी पोलीसांना सांगितले.

दोन दिवस पोलीस कोठडी

अजित सावंत यांच्या अटकेनंतर त्याला येथील न्यायालयात हजर केले असता.न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान घटनेनंतर पोलीसांनी ओरोस येथील रॅम्बो या श्वानपथकाला घटनास्थळी बोलवले होते. यावेळी श्वानाने एवढ्या ग्रामस्थांमध्ये अजित याच्यावर झडप घेतल्याने त्याच्यावरील संशय तसेच चप्पलावर असलेले रक्ताचे डाग यामुळे संशय बळावल्यानेच पोलीसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.

Web Title: Bloodstains on Rambo's valve and slippers, the brother's involvement in the murders in the oval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.