बाबासाहेबांची ‘ती’ ब्ल्यू प्रिंट बौद्धमय बनविणारी होती

By admin | Published: September 22, 2015 10:47 PM2015-09-22T22:47:25+5:302015-09-22T23:25:35+5:30

राजरत्न आंबेडकर : वाघिवरे येथे जनजागरण प्रबोधन संमेलन

The 'Blue' print of Babasaheb was Buddhist | बाबासाहेबांची ‘ती’ ब्ल्यू प्रिंट बौद्धमय बनविणारी होती

बाबासाहेबांची ‘ती’ ब्ल्यू प्रिंट बौद्धमय बनविणारी होती

Next

देवगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय करण्याचे जे स्वप्न ठेवले होते, ते साकार करण्यासाठीच दि बुद्धीष्ट सोसायटी आॅफ इंडिया तथा महासभेची स्थापना केली होती. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना करताना या संस्थेची उद्देशिका, कार्यप्रणाली, नियमांची ब्ल्यू पिंं्रट तयार करून ठेवली होती. परंतु आमच्या लोकांना हे माहितच नाही. डॉ. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेसाठी बनविलेली ब्ल्यू पिंं्रट ही केवळ या संस्थेची नव्हती तर या देशाला बौद्धमय बनविणारी होती, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय महासचिव राजरत्न आंबेडकर यांनी देवगड तालुक्यातील वाघिवरे या ठिकाणी व्यक्त केले. देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ विजयदुर्ग विभागाच्यावतीने महापुरूष जीवनसंदेश अभियानाअंतर्गत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या शृंखलाबद्ध विशेष जनजागरण प्रबोधन संमेलनामध्ये उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत विचारमंचावर संघाचे अध्यक्ष किशोर कांबळे, उपाध्यश दिलीप वाडेर, कार्याध्यक्ष तिर्लोटकर, डी. के. पेडणेकर, महिला अध्यक्ष सुरभी पुरळकर, उपाध्यक्षा अर्पिता साळुंखे, गाव शाखेचे अध्यक्ष मनोहर सावंत तसेच मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत आठवले, सुनील भालेराव, प्रदिप सावंत, रहाटे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख दहा उद्देश निश्चित केले होते. यामध्ये भारताला बौद्धमय करण्याचाच मुख्य उद्देश दिसून येतो. राजरत्न म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी लिहून ठेवले की, भारतीय बौद्ध महासभेव्दारे देशात शाळा आणि महाविद्यालयांची निर्मिती करण्यात यावी. यामध्ये धर्माच्या आधारावर विज्ञानवादी शिक्षण दिले जावे. यामुळे प्रत्येक धर्माचा चिकीत्सक पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करून कोणता धर्म जनकल्याणाचा आहे हे ठरविण्याची बौध्दीक क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल. (प्रतिनिधी)+


बौद्ध महासभेव्दारे पूर्ण क्षमतेने काम करणार
ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेव्दारे देशात दवाखाने, अनाथालये, मदत केंद्रे स्थापन करण्यात यावीत असे सांगितले. डॉ. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे दवाखाने, अनाथालये, मदत केंद्रे स्थापन झाली असती तर सरकारकडून आरोग्याच्या कोणत्याही सुविधा घेण्याची गरज उरली नसती. स्कोणत्याही योजनांसाठी याचना करण्याची गरज पडणार नव्हती. परंतु गेल्या ५९ वर्षात यावर काहीच काम झाालेले नाही. त्यामुळे आता भारतीय बौद्ध महासभेव्दारे बाबासाहेबांचा उद्देश पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याचे ते म्हणाले.


बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम.
बौध्दजन सेवा संघातर्फे महापुरूष जीवनसंदेश अभियानांतर्गत संमेलन.
बाबासाहेबांनी भारतीय बौध्द महासभेचे दहा उद्देश केले होते निश्चित : राजरत्न आंबेडकर.

Web Title: The 'Blue' print of Babasaheb was Buddhist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.