बांदा-तेरेखोल नदीपात्रात आढळला मृतदेह, स्थानिकांच्या साह्याने मदत कार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 11:29 AM2022-03-23T11:29:24+5:302022-03-23T11:29:57+5:30
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र मृतदेह बाहेर काढताना अडचणी येत आहेत.
बांदा : तेरेखोल नदीपात्रात आज, बुधवारी एका पुरुषाचा मृतदेह तरंगत्या स्थितीत आढळला. याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी बांदा पोलिसांना दिली. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र मृतदेह बाहेर काढताना अडचणी येत आहेत.
खतीब यांनी मिळलेल्या माहितीची खात्री करण्यासाठी नदीपात्रावर जात पाहणी केली. मात्र मृतदेह हा शेर्ले नदीपात्रालगत असल्याने याची माहिती त्यांनी बांदा पोलिसांना दिली. पोलीस शेर्ले येथून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत. मात्र पाणी जास्त असल्याने होडीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, शेर्ले सरपंच उदय धुरी घटनास्थळी उपस्थित आहेत.