तळकोकणातही ‘किटली’तील दुधाला फुटली उकळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:37 AM2018-07-17T00:37:09+5:302018-07-17T00:37:17+5:30

The boiled milk in kettlelle boils in the bottom | तळकोकणातही ‘किटली’तील दुधाला फुटली उकळी

तळकोकणातही ‘किटली’तील दुधाला फुटली उकळी

Next


सिंधुदुर्गनगरी : गुजरात, गोवा व कर्नाटक राज्यांच्या धर्तीवर दुधाला प्रति लीटर आठ रुपये अनुदान देण्यात यावे, दुधाळ जनावरे खरेदीसाठी ९० टक्के अनुदान मिळाले, दूध वाहतूक खर्चासाठी अनुदान देण्यात यावे यांसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी जिल्हाभरातील दुग्ध उत्पादक शेतकरी एकवटले. आपल्या न्याय मागण्यांसाठी ओरोस येथील रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी भवनावर काढण्यात आलेल्या मोर्चात असंख्य शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन किटली आंदोलन यशस्वी केले. शासनविरोधी घोषणाबाजीने शेतकºयांनी सिंधुदुर्गनगरी दणाणून सोडली.
दुधाला योग्य हमीभाव मिळावा यासह अन्य नऊ मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी किटली आंदोलन छेडण्यात आले. सकाळी १० वाजल्यापासून जिल्ह्यातील कानाकोपºयातून शेतकरी ओरोस येथील रवळनाथ मंदिराजवळ जमा होत होते.
आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते ओरोसचे ग्रामदैवत श्री रवळनाथाचरणी दुधाचा अभिषेक घालून व गोमातेचे पूजन करून हजारो शेतकºयांच्या उपस्थितीत सकाळी ११.३० च्या सुमारास मोर्चास सुरुवात झाली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा दुग्ध उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी आमदार पुष्पसेन सावंत, संग्राम प्रभुगांवकर, अतुल काळसेकर, एकनाथ नाडकर्णी, संदेश सावंत, विकास कुडाळकर, अंकुश जाधव, दिलीप रावराणे, मनिष परब, प्रमोद कामत, सुभाष दळवी, गुरुनाथ पेडणेकर, दादा साईल, प्रमोद परब, चंद्रकांत परब, अस्मिता बांदेकर यांच्यासह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले होते.
सकाळी ११.३० वाजता किटली आंदोलनास खºया अर्थाने सुरुवात झाली. ओरोस रवळनाथ मंदिर येथून असंख्य शेतकºयांचा निघालेला मोर्चा शासनविरोधी अनेक घोषणा देत १२.१५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. प्रत्येक शेतकºयाच्या हातात किटली दिसून येत होती. मोर्चाच्या मध्यभागी गायींचा समावेश होता. शासनाप्रती शेतकºयांच्या मनात असणारा असंतोष यावेळी दिसून येत होता.
हा मोर्चा दुपारी १२.१५ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी आमदार पुष्पसेन सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी उपस्थित हजारो शेतकºयांना संबोधित करीत सरकारवर निशाणा साधला.
एकीकडे पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात दूध उत्पादकांना थेट पाच रुपये अनुदानासाठी सुरू असलेल्या आंदोलनास गालबोट लागले असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आलेले किटली आंदोलन मात्र लोकशाहीच्या मार्गाने पार पडले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, जिल्ह्यातील शेतकºयांनी या आंदोलनास कोणतेही गालबोट न लावता अगदी सनदशीर
व लोकशाहीच्या मार्गाने हे आंदोलन छेडले.
यावेळी जिल्हाधिकारी भवनात दुधाचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी कामानिमित्त फिरतीवर गेल्याने त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या टेबलवर दुधाच्या किटल्या ठेवल्या. निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी शेतकºयांचे निवेदन स्वीकारले. यावेळी शेतकरी व आमदार राणे यांनी विजय जोशी व दुग्धविकास अधिकारी प्रकाश आवटे यांना दुधाचे वाटप केले.
‘दूध उत्पादक शेतकºयांच्या एकजुटीचा विजय असो, सत्ताधारी तुपाशी मग शेतकरी का उपाशी?, दुधाला योग्य हमी भाव मिळाला पाहिजे, दूध का दूध आणि पाण्याचे पाणी झालेच पाहिजे’ आदी विविध गगनभेदी घोषणा देऊन शेतकºयांनी येथील परिसर दणाणून सोडला.

Web Title: The boiled milk in kettlelle boils in the bottom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.