त्या योजनेचा बोजवारा, वैभववाडी भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 06:57 PM2020-06-26T18:57:29+5:302020-06-26T19:00:43+5:30

राज्य सरकारच्या बांधावर खते आणि बियाणे वाटप योजनेचा बोजवारा उडाला असून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आला असल्याने सरकारने तत्काळ कर्जवाटप आणि खतपुरवठा करावा, अशी मागणी तालुका भाजपाच्यावतीने निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

Bojwara of that scheme, Vaibhavwadi BJP's statement to tehsildar | त्या योजनेचा बोजवारा, वैभववाडी भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

त्या योजनेचा बोजवारा, वैभववाडी भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

Next
ठळक मुद्देत्या योजनेचा बोजवारा, वैभववाडी भाजपाचे तहसीलदारांना निवेदन कर्जमाफी फसवी ठरल्याचाही आरोप

वैभववाडी : राज्य सरकारच्या बांधावर खते आणि बियाणे वाटप योजनेचा बोजवारा उडाला असून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आला असल्याने सरकारने तत्काळ कर्जवाटप आणि खतपुरवठा करावा, अशी मागणी तालुका भाजपाच्यावतीने निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, राजेंद्र राणे, किशोर दळवी, हर्षदा हरयाण, शुभांगी पवार आदी उपस्थित होते.

भाजपाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोनाचे संकट आहे म्हणून खरीप हंगाम थांबणार नाही. परंतु राज्य सरकारकडून खरीप हंगामाच्या दृष्टीने कोणतीही पूर्वतयारी करण्यात आलेली नाही. सरकारने बांधावर बियाणे आणि खत पुरविण्याची योजना जाहीर केली; परंतु ती पूर्णत: असफल ठरली आहे.

शेतकऱ्यांना अजूनही खते मिळालेली नाहीत. दुसरीकडे जिल्हा बँकेकडून कर्ज वाटपाच्या याद्या तयार होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप अनेक शेतकऱ्यांना झालेला नाही. याशिवाय नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. त्यांचा त्वरित कर्जमाफीच्या यादीत समावेश करावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.

तालुक्यात एसटी सेवा सुरू करा

लॉकडाऊनमुळे तालुक्यातील संपूर्ण एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यात एसटी बससेवा तातडीने सुरु करावी, अशी मागणी भाजपतर्फे स्वतंत्र निवेदनाद्वारे नायब तहसीलदार ए. के. नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे.

कर्जमाफीपासून शेतकरी वंचित

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप शेतकऱ्यांना झालेला नाही. भाजपा सरकारने खावटी कर्जधारक शेतकऱ्यांना मंजूर केलेले १३ कोटी रुपयेसुद्धा मिळालेले नाहीत. शासनाच्या कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित आहेत.


 

Web Title: Bojwara of that scheme, Vaibhavwadi BJP's statement to tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.