बोलोरो गाड्यांच्या कर्ज प्रकरणाचा तपास राज्याकडून व्हावा, आ. दिपक केसरकर यांची मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 04:43 PM2021-12-19T16:43:38+5:302021-12-19T16:52:10+5:30

Boloro car loan case :पोलिसांनी कणकवली हल्ल्यामागील सुत्रधार शोधावा अशी मागणी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी केली आहे.

Boloro car loan case should be investigated by the state, demanded MLA Deepak Kesarkar | बोलोरो गाड्यांच्या कर्ज प्रकरणाचा तपास राज्याकडून व्हावा, आ. दिपक केसरकर यांची मागणी  

बोलोरो गाड्यांच्या कर्ज प्रकरणाचा तपास राज्याकडून व्हावा, आ. दिपक केसरकर यांची मागणी  

googlenewsNext

सावंतवाडी : काँग्रेसमध्ये असताना नारायण राणे यांनी तत्कालीन काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या नावावर घेतलेल्या बोलोरो गाड्यांच्या कर्ज प्रकरणी तत्कालीन सिंधुदुर्ग जिल्हा बॅक अध्यक्ष राजन तेली यांची ठाणे पोलीसाच्या अर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला असून हा तपास सिंधुदुर्ग पोलीसिकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र हा तपास राज्याच्या स्तरावर केला जावा तसेच पोलिसांनी कणकवली हल्ल्यामागील सुत्रधार शोधावा अशी मागणी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी केली आहे.
ते रधिवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत,काँग्रेस नेते विकास सावंत,माजी मंत्री प्रविण भोसले,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,व्हिक्टर डाॅन्टस,पुंडलिक दळवी,विद्याप्रसाद बांदेकर,अशोक दळवी आदि उपस्थीत होते.


केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशतवाद यापूर्वी आम्ही संपवला आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूका आल्यानंतर असे हल्ले करून दहशत निर्माण करण्याची राणेची जुनी सवय आहे.मात्र ही दहशत जिल्हा बँक निवडणुकीत जनता खपवून घेणार नाही.जिल्हा बँकेचे जे 982 मतदार आहेत त्याची यादी पोलीसांकडून मागवण्यात आली असून पोलीस आपल्या पध्दतीने काम करतील पण पोलीसांनी अशी दहशत खपवून घेऊ नये अशी मागणी ही केसरकर यांनी केली आहे.


कणकवलीत शिवसेनेच्या माजी सरपंचावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत मात्र आमदार नितेश राणे हे उद्योजक किरण सावंत व खासदार विनायक राऊत यांनी हा हल्ला घडवून आणला अशा प्रकारची टीका करून स्वतःचे अज्ञानच पाजळत आहेत आमदार नितेश राणे व निलेश राणे हे दोघे बालिश आहेत. त्यामुळे आगामी काळात होवू घातलेल्या निवडणूकांमध्ये पुन्हा दहशतवादाला येथील जनतेने सत्तेपासून दूर ठेवावे निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे समर्थक व पदाधिकारी मतदारांवर दबाव आणत आहेत. त्यामुळे मंत्रीपदाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी जिल्ह्याबाहेर जावे अशी मागणी ही केसरकर यांनी केली आहे.

अंकुश राणे खुन प्रकरणाची फाईल पन्हा उघडावी.
आमदार नितेश राणे यांनी आपली कुठलीही प्रकरणे बाहेर काढा असे आवाहन सरकार ला देत असतील तर सरकार ही तयार आह.मी गृहराज्यमंत्री असतना विधान सभेत अकुश राणे खुन प्रकरणाची फाईल पुन्हा सरकार उघडून सखोल तपास करेल असे सांगितले होते.याची आठवण करून देत केसरकर यानी मी स्वता मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे मागणी करेल असे सांगितले.राणेना ही वाटत असेल आपल्या काका ना न्याय मिळावा असा टोला ही केसरकर यांनी लगावला.

Web Title: Boloro car loan case should be investigated by the state, demanded MLA Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.