सिंधुदुर्गचा बोंडू अल्पदरात चाललाय गोव्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:15 PM2021-03-13T17:15:30+5:302021-03-13T17:16:58+5:30

fruits Sindhudurg- राजकीय अनास्थेमुळे काजू-बोंडू प्रक्रिया उद्योग रखडले असून, सिंधुदुर्गचा काजू बोंडू गोवा राज्यात नेऊन त्यावर प्रक्रिया केली जात आहे. मात्र येथील सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा काजू बोंडू अल्पदरात गोव्यात जात आहे. सावंतवाडी तालुक्यात दोन सहकारी तत्त्वावर प्रकल्प नोंदणी करण्यात आले होते. मात्र या प्रकल्प संस्थाना शासन दरबारी योग्य ती सहकार्याची भूमिका मिळाली नसल्याने दोडामार्ग आणि आरोंदा येथील काजू उत्पादक सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत.

Bondu of Sindhudurg is running cheaply in Goa! | सिंधुदुर्गचा बोंडू अल्पदरात चाललाय गोव्यात !

सिंधुदुर्गचा बोंडू अल्पदरात चाललाय गोव्यात !

googlenewsNext
ठळक मुद्देसिंधुदुर्गचा बोंडू अल्पदरात चाललाय गोव्यात ! प्रकिया उद्योग उभारण्याची मागणी : सरकारची अनास्था कारणीभूत

अनंत जाधव

सावंतवाडी : राजकीय अनास्थेमुळे काजू-बोंडू प्रक्रिया उद्योग रखडले असून, सिंधुदुर्गचा काजू बोंडू गोवा राज्यात नेऊन त्यावर प्रक्रिया केली जात आहे. मात्र येथील सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा काजू बोंडू अल्पदरात गोव्यात जात आहे. सावंतवाडी तालुक्यात दोन सहकारी तत्त्वावर प्रकल्प नोंदणी करण्यात आले होते. मात्र या प्रकल्प संस्थाना शासन दरबारी योग्य ती सहकार्याची भूमिका मिळाली नसल्याने दोडामार्ग आणि आरोंदा येथील काजू उत्पादक सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत.

गोवा आणि केरळ राज्याने काजू बागायतदार शेतकऱ्यांना काजू बीला हमीभाव दिला आहे. केरळ राज्याचे काजू बोर्डाची कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झाली आहेत. मात्र महाराष्ट्रात काजूला हमीभाव नाही आणि मागणी असूनही काजू बोर्ड निर्माण झालेले नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात काजू बोंडूवर प्रक्रिया उद्योग नसल्याने ही बोंडू गोवा राज्यात निर्यात केला जातात. या बोंडूंना एका डब्यामागे १३ रुपये, तर दोडामार्ग भागांमध्ये किलोमागे २० किंवा २५ पैसे असा दर मिळतो. गोवा राज्यातील काजू फेणी किंवा काजू मद्यनिर्मिती प्रकल्पधारक कारखानदार दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील काजू बागायतीमधून ही बोंडूप्रक्रियेसाठी घेऊन जातात. या काजू बोंडापासून मद्यार्क निर्माण करतात. काजू प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात निर्माण करण्यासाठी राजकीय आशीर्वादाची गरज आहे. मात्र राजकीय अनास्थेमुळे काजू बोंडूवर प्रक्रिया होत नाहीत.

कोकण कृषी विद्यापीठाने काजू बोंडूवर प्रक्रिया करणारी छोटी छोटी यंत्रे तयार केली आहेत.मात्र त्यावर आधारित शासनाच्या सबसिडीसह उत्पादन आणि मार्केटिंगबाबत योजना नसल्यामुळे काजू बोंडू गोव्यातील कारखानदारांच्या दरानुसार विकावी लागत आहेत, असे काजू बागायतदार शेतकरी बोलताना सांगतात.

काजू बागायतदारांच्या अडचणीत आणखी भर

गोवा राज्यात महागड्या मद्यार्क निर्मितीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बोंडू फायदेशीर ठरत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय अनास्था शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे. फक्त श्रेयासाठी राजकारण तापले जाते, पण शेतकरी बागायतदार मात्र चिंताग्रस्त बनले आहेत.या हंगामात पर्यावरणातील बदल व अवकाळी पावसाने काजू बागायतदारांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

Web Title: Bondu of Sindhudurg is running cheaply in Goa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.