सिंधुदुर्ग एअरपोर्टवरून विमानाचे बुकिंग सुरू, फक्त दीड तासांत मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 01:07 PM2021-09-23T13:07:07+5:302021-09-23T13:07:55+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळ आता सुरू होत आहे. या विमानतळाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सिंधुदुर्ग एअरपोर्ट या नावाने हे विमानतळ सुरू होणार असून ९ ऑक्टोंबर रोजी पहिले विमान प्रवासी घेऊन या विमानतळावर उतरणार आहे.

Booking of flight starts from Sindhudurg Airport, Mumbai in one and half hours | सिंधुदुर्ग एअरपोर्टवरून विमानाचे बुकिंग सुरू, फक्त दीड तासांत मुंबईत

सिंधुदुर्ग एअरपोर्टवरून विमानाचे बुकिंग सुरू, फक्त दीड तासांत मुंबईत

googlenewsNext
ठळक मुद्दे स्टेशन व्यवस्थापक समिर कुलकर्णी यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग ते मुंबई रस्त्याने प्रवास केल्यास सुमारे ९ तास ते २० मिनिटे लागतात पण हाच प्रवास हवाईमार्गे विमानाने केल्यास प्रवाशांसाठी फक्त १ तास २५ मिनिटांचा हा प्रवास असणार आहे

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ९ ऑक्टोंबर रोजी विमानतळावर पहिले प्रवासी वाहतूक करणारे विमान उतरणार आहे. या विमानाची बुकिंग आज गुरुवार २३ सप्टेंबरपासून एअर इंडियाच्या वेबसाईटला सुरू करण्यात आली आहे अशी माहिती सिंधुदुर्ग एअरपोर्टचे स्टेशन व्यवस्थापक कुलकर्णी यांनी दिली. विशेष म्हणजे सिंधुदुर्गातून मुंबईला फक्त 1 तास 25 मिनिटांत हे विमान पोहोचणार आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळ आता सुरू होत आहे. या विमानतळाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सिंधुदुर्ग एअरपोर्ट या नावाने हे विमानतळ सुरू होणार असून ९ ऑक्टोंबर रोजी पहिले विमान प्रवासी घेऊन या विमानतळावर उतरणार आहे. यासंदर्भात विमानतळाचे स्टेशन व्यवस्थापक समिर कुलकर्णी यांनी सांगितले की, ९ ऑक्टोबर पासून सुरु होणारे हे विमान दररोज असणार आहे. हे विमान दररोज दुपारी ११. ३५ वाजता मुंबईहून सुटून ते १ वाजेपर्यंत सिंधुदुर्गात येणार आहे आणि सिंधुदुर्ग हून मुंबईला जाण्यासाठी १ तास २५ वाजता सुटून २.५० वाजेपर्यंत मुंबईत जाणार आहे. हे विमान ७० वाहन क्षमता असून केंद्राच्या उडान योजनेत अंतर्भूत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

१ तास २५ मिनिटात मुंबई

यावेळी स्टेशन व्यवस्थापक समिर कुलकर्णी यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग ते मुंबई रस्त्याने प्रवास केल्यास सुमारे ९ तास ते २० मिनिटे लागतात पण हाच प्रवास हवाईमार्गे विमानाने केल्यास प्रवाशांसाठी फक्त १ तास २५ मिनिटांचा हा प्रवास असणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा इतर वेळ वाचणार आहे.

सिंधुदुर्गातून इतर शहरांमध्ये जाण्याची संधी

सिंधुदुर्गातून मुंबईला जाणारे विमान हे मुंबई येथे २ वाजून ५० मिनिटांनी पोहोचणार आहे आणि त्यानंतर ज्या मुंबई विमानतळावरून विमानसेवा असतात‌. त्या दिल्ली बेंगलोर, कोलकत्ता, हैदराबाद आणि चेन्नई सारख्या महानगरात जाणाऱ्या विमानसेवा असतात. त्यामुळे या महानगरांमध्ये जायचे असेल तर या विमान सेवेचा फायदा होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

उत्तर गोव्यातही जाण्याची सोय 

सिंधुदुर्ग एअरपोर्टवर उतरल्यानंतर उत्तर गोव्यात जाणार्‍या प्रवाशांसाठी हे विमानतळ चांगला पर्याय आहे. चिपीवरून तेरेखोल, अरंबोल आणि मांद्रेम समुद्रकिनारा-यांसाठी ड्रायव्हिंग अंतर अंदाजे ६० किमी आहे. गोव्याच्या दाबोळी विमानतळाच्या समान आहे. त्यामुळे सिंधुदुर्गचे पर्यटन पाहून प्रवासी गोव्याला जाऊ शकतो.

विमानाची ऑनलाईन बुकिंग सुरु

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ ऑक्टोबरला पहिले प्रवासी विमान उतरणार आहे.आणि या विमान नाचे ऑनलाईन बुकिंग आज गुरुवार २३ सप्टेंबर पासून एअर इंडियाच्या www.airIndia.in या वेबसाईटला सुरू झाले आहे. यासाठी प्रवाशांनी
SDW हा बुकिंग कोड नोंद करावा अशी माहिती त्यांनी दिली.
 

Web Title: Booking of flight starts from Sindhudurg Airport, Mumbai in one and half hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.