रत्नागिरीच्या दोघी महाराष्ट्र संघात

By admin | Published: November 16, 2015 09:31 PM2015-11-16T21:31:08+5:302015-11-17T00:05:36+5:30

खो - खो संघ जाहीर : राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा सोलापुरात

Both of Ratnagiri, in the Maharashtra team | रत्नागिरीच्या दोघी महाराष्ट्र संघात

रत्नागिरीच्या दोघी महाराष्ट्र संघात

Next

रत्नागिरी : दि. २३ ते २७ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत सोलापूर येथे होणाऱ्या ४९ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंंक्यपद खो - खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे संघ जाहीर करण्यात आले आहेत. मुलींच्या संघात रत्नागिरीतील ऐश्वर्या सावंत, आरती कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. पुरूष संघाच्या कर्णधारपदी सांगलीच्या युवराज जाधवची तर महिला संघाची कर्णधार म्हणून ठाण्याच्या मीनल भोईरची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे संघ पुढीलप्रमाणे : पुरूष संघ - युवराज जाधव (कर्णधार), मिलिंंद चावरेकर, नरेश सावंत, मायाप्पा हिरेकुर्ब, दीपक माने (सर्व सांगली), अनिकेत पोटे, हर्षद हातणकर (दोघेही मुंबई उपनगर), प्रतीक वाईकर , मुकेश गोसावी (पुणे), महेश शिंंदे (ठाणे), सागर लेंगरे (सोलापूर) , श्रेयस राऊळ (मुंबई शहर), प्रशिक्षक ऐजाज शेख (पालघर), व्यवस्थापक उत्तम घोरपडे (सातारा)
महिला संघ - मीनल भोईर (कर्णधार), कविता घाणेकर, शीतल भोर, प्रियांका भोपी (सर्व ठाणे), ऐश्वर्या सावंत, आरती कांबळे (दोघी रत्नागिरी), सारिका काळे, सुप्रिया गाढवे (दोघी उस्मानाबाद), श्वेता गवळी, रोहिणी गोरे (दोघी अहमदनगर), प्रणाली बेनके (पुणे), प्रियांका येळे (सातारा). प्रशिक्षक राजेंद्र साप्ते (पुणे), व्यवस्थापिका नीलम देशमुख (सातारा). (प्रतिनिधी)

Web Title: Both of Ratnagiri, in the Maharashtra team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.