हत्तींसाठी तळकट वनबागेची चाचपणी

By Admin | Published: April 21, 2015 10:35 PM2015-04-21T22:35:56+5:302015-04-22T00:31:18+5:30

लवकरच करणार पाहणी : उपवनसंरक्षकांचा दुजोरा

Bottom line for elephants | हत्तींसाठी तळकट वनबागेची चाचपणी

हत्तींसाठी तळकट वनबागेची चाचपणी

googlenewsNext

सावंतवाडी : आंबेरीत ठेवण्यात आलेल्या हत्तींमधील एका हत्तीचा मृत्यू झाल्याने वनविभाग अन्य दोन हत्तींना कुठे हलवायचे या विवंचनेत असून, सोमवारी उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी तळकट वनबागेत दोन हत्ती ठेवण्याबाबत चाचपणी सुरू असल्याचे स्पष्ट केले. तळकट वनबागेत वनविभागाची पुरेशी जागा असून, तेथे छोटेसे धरण बांधण्यास सोपे जाईल, असे ते म्हणाले. जर जागेबाबत अंतिम निर्णय झाला, तर त्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठवणार असल्याचेही ते
म्हणाले.आंबेरीत ठेवण्यात आलेल्या तीन हत्तींपैकी गणेश या हत्तीचा मागील आठवड्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. आंबेरीतील जागा पुरेशी नाही. हत्तींना वेळेवर पाणी मिळत नाही. तसेच उन्हाचा तडाखा, आदी प्रश्नांमुळे हत्तींना सोयीस्कर ठिकाणी कसे हलवता येईल, याबाबत वनविभाग चाचपणी करीत असून, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिलारी व तळकट या जागेबाबत विचार सुरू केला आहे.
तिलारी येथे ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. त्यामुळे हत्ती तेथे हलवणे सध्या तरी शक्य नाही. उलट तळकट येथे वनविभागाची दीडशे ते दोनशे एकर जमीन आहे. या ठिकाणी मोठे क्रॉल उभारून हत्तींना ठेवणे शक्य आहे. तसेच हत्तींसाठी छोटेसे धरणही उभारण्यासाठी पुरेसे पाणी आहे. या सर्व गोेष्टींमुळे वनविभाग तळकट वनबागेचा विचार करीत आहे. उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनीही याला दुजोरा देत या जागेची आम्ही पाहणी करणार असून, जागा योग्य वाटल्यास तातडीने शासनाला प्रस्ताव देऊ, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

हत्ती १५ मेपर्यंत क्रॉल बाहेर
आंबेरी येथे ठेवण्यात आलेल्या दोन हत्तींना १५ मेपर्यंत क्रॉलबाहेर काढण्याचे आमचे प्रयत्न सुरू असून, डॉ. उमाशंकर यांच्याशी बोलणे सुरू असल्याचे यावेळी एस. रमेशकुमार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Bottom line for elephants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.