कणकवलीत शहरात पुन्हा धाडसी चोरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 12:47 PM2020-11-07T12:47:58+5:302020-11-07T12:50:32+5:30
Crimenews, sindhudurg, police कणकवली शहरात चोरट्यांची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. शुक्रवार ६ नोव्हेंबरला मध्यरात्री कणकवली शहरातील एक बंगला व ३ फ्लॅट चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह सोन्याचांदीचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे कणकवली शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सुधीर राणे
कणकवली : कणकवली शहरात चोरट्यांची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. शुक्रवार ६ नोव्हेंबरला मध्यरात्री कणकवली शहरातील एक बंगला व ३ फ्लॅट चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह सोन्याचांदीचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे कणकवली शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बंद फ्लॅट व बंगला लक्ष करुन चोरट्यांनी पुन्हा चोरीचे सत्र सुरु केले आहे. कणकवली शहरातील जळकेवाडी येथील पत्रकार सदनामधील भालचंद्र बाजीराव साटम यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी ८० हजारांची रोख रक्कम लंपास केली.तसेच चांदीच्या साखळ्या व भांडी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे.तसेच श्रीराम अपार्टमेंट मधील मनीषा शशिकांत गावकर रूम नंबर ३१८, नाथ पै नगर , कणकवली यांचा फ्लॅट फोडला.
वडीलांची शस्त्रक्रिया करण्यासाठी घरात ठेवलेली ७० हजारांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली.दोन्ही फ्लॅट मध्ये कपाट उचकटून चोरट्यांनी चोरी केली आहे. तसेच श्रीराम अपार्टमेंटमधील बी विंग मध्ये बाळकृष्ण लक्ष्मण सावंत यांचा फ्लॅट चोरट्यांनी फोडला आहे. त्याचबरोबर शिवनेरी महापर्व बंगला चोरट्यांनी फोडला. मालक उदय शिवाजी सावंत असून ते सध्या पुण्याला आहेत.
या बंगल्यातही चोरीचा प्रयत्न त्यांनी केला आहे.एकूण चार ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून रोख रक्कम व चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. चोरीची घटना झाल्याचे समजताच कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कदम , सहाय्यक उपनिरीक्षक बापू खरात,पोलीस हवालदार के.के.मेठे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.तसेच श्वान पथकाव्दारे चोरांचा माग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.अधिक तपास पोलीस करत आहेत.