Sindhudurg: नारुर समतानगर येथील पूल आठ दिवसांपासून पाण्याखाली, गावाशी संपर्क तुटला; नागरिकांचे हाल
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 12, 2024 06:57 PM2024-07-12T18:57:06+5:302024-07-12T18:57:29+5:30
रजनीकांत कदम कुडाळ : गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नारुर येथील समतानगरकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आठ दिवसांपासून ...
रजनीकांत कदम
कुडाळ : गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नारुर येथील समतानगरकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आठ दिवसांपासून या समतानगर येथील लोकांचा संपर्क गावापासून तुटला आहे. त्यामुळे येथील लोकांचे मोठे हाल झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा डोंगर भागातील गावांना बसला आहे. यात नारुर गावाचाही समावेश असून, येथील समतानगरकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आठ दिवसांपासून या वाडीतील लोकांचा संपर्क गावापासून तुटला आहे. त्यामुळे येथील लोकांचे मोठे हाल झाले आहेत.
डोंगर भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असल्याने नारुर गडनदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. यामुळे नदीकाठच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, याची दखल कोणीही घेतलेली नाही. ग्रामपंचायतीकडूनही दखल घेण्यात न आल्याने येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुलावर पाणी असल्याने गावापासून संपर्क तुटला आहे, प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालून येथील लोक पुलावरून ये - जा करताहेत. रांगणा गड परिसरात मोठा पाऊस दरवर्षी पडत असतो. मात्र, येथील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पुलावर पाणी येथे व येथील लोकांचा गावाशी संपर्क तुटतो. त्यामुळे प्रशासनाने दखल घ्यावी व येथील पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली जात आहे.
येथील मुसळधार पाऊस व नदीला आलेला पूर यामुळे येथील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी काठावरील घरांना धोका निर्माण झाला आहे. तरी प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.