आठवणीतील वेंगुर्ला पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 02:47 PM2020-07-21T14:47:19+5:302020-07-21T14:49:37+5:30

संजय घोगळे यांचे आपल्या गावाप्रती असलेले प्रेम पाहून आपणास फारच कौतुक वाटले. त्यांनी यापुढेही वेंगुर्ल्याच्या अशा अनेक आठवणी पुस्तकरुपाने लोकांसमोर आणाव्यात, अशी अपेक्षा प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज यांनी आठवणीतील वेंगुर्ला या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केली.

The brilliant publication of the memorable Vengurla book | आठवणीतील वेंगुर्ला पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन

आठवणीतील वेंगुर्ला पुस्तकाचे प्रकाशन प. पू. विनायक अण्णा महाराज, शेखर सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

Next
ठळक मुद्दे संजय घोगळेंच्या गावाप्रती प्रेमाचे कौतुक वाटते विनायक अण्णा राऊळ महाराज यांच्याकडून गौरव

वेंगुर्ला : संजय घोगळे यांचे आपल्या गावाप्रती असलेले प्रेम पाहून आपणास फारच कौतुक वाटले. त्यांनी यापुढेही वेंगुर्ल्याच्या अशा अनेक आठवणी पुस्तकरुपाने लोकांसमोर आणाव्यात, अशी अपेक्षा प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज यांनी आठवणीतील वेंगुर्ला या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केली.

वेंगुर्ल्याचे सुपुत्र व मुंबई येथे प्रशासकीय सेवेत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले संजय घोगळे यांच्या आठवणीतील वेंगुर्ला या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पिंगुळी येथील संत राऊळ महाराज मठात पार पडला. प. पू. विनायक अण्णा महाराज यांच्या हस्ते व पत्रकार शेखर सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यशाची कमान चढत असताना जो आपला गांव, आपली माणसे, आपले गरिबीचे दिवस सदैव स्मरणात ठेवतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून यशाची शिखरे पार करतो. वेंगुर्ल्याचे सुपुत्र संजय घोगळे हे त्यापैकी एक आहेत. प्रकाशन सोहळ्याला बाई माँ, सुभाष घोगळे, जगदीश सापळे, माजी तहसीलदार अशोक पवार, प्रमोद तेंडुलकर, अण्णा महाराज यांचे सुपुत्र विठोबा राऊळ, राऊळ महाराज सेवा ट्रस्टचे माजी लेखनिक प्रभाकर भाईप, अनिल होडावडेकर, दिनेश ठाकूर, ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भारती सावेकर, छाया भाईप, रश्मी भाईप, लता घोगळे, मयूर घोगळे, वैशाली घोगळे आदी उपस्थित होते.

पुस्तकाला तोड नाही

प्रशासकीय सेवा बजावत असताना आपल्या गावच्या आठवणींना आठवणीतील वेंगुर्ला या पुस्तकाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने उजाळा दिला आहे, त्याला तोडच नाही, असे उद्गार पत्रकार शेखर सामंत यांनी काढले. घोगळे यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, असेही ते म्हणाले.

 

Web Title: The brilliant publication of the memorable Vengurla book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.