Budget session: आरोप प्रत्यारोपात सत्ताधारी-विरोधक व्यस्त, परशुराम उपरकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 02:54 PM2022-03-24T14:54:59+5:302022-03-24T15:02:02+5:30

सध्या वाढलेली महागाई, अडचणी या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर विधिमंडळात चर्चा होताना दिसत नाही.

Budget session: Opposition-ruling party busy in removing unidhuni, Criticism of Parashuram Upkar | Budget session: आरोप प्रत्यारोपात सत्ताधारी-विरोधक व्यस्त, परशुराम उपरकरांची टीका

Budget session: आरोप प्रत्यारोपात सत्ताधारी-विरोधक व्यस्त, परशुराम उपरकरांची टीका

Next

कणकवली : सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहाची प्रतिष्ठा राखली जात नाही. आमदारांचे विविध प्रश्न तसेच मतदारसंघाचा विकासनिधी, सांघिक विकासकामे याबाबत मांडणी केली जाते. मात्र सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमेकांची उणीधुनी काढत, लोकप्रतिनिधी कोट्यवधीची माया कशी जमा करतात हे दाखवून देत जनतेची करमणूक केली जात आहे. अशी टीका मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.

कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यलयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले, सध्या वाढलेली महागाई, अडचणी या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर विधिमंडळात चर्चा होताना दिसत नाही. प्रशासनातील अनेक अधिकारी मुजोर झाले आहेत. संबधित खात्याच्या मंत्र्याला जे जमणार नाहीत असे आर्थिक घोटाळे अनेक अधिकारी एकमेकांच्या संगनमताने करतात. हेही उघड होत आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष तसेच विरोधी भाजपा पक्ष बदनाम होत आहेत.

टक्केवारीच्या राजकारणात जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्राप्त झालेला निधी मागील वर्षी अखर्चित राहिला होता. यावर्षीही तशीच स्थिती आहे. रिक्त असलेली जिल्हा शल्यचिकित्सक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची पदे भरण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्यांना जनतेच्या आरोग्याचे तसेच इतर प्रश्नांचे काहीच वाटत नाही. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी खर्च होणाऱ्या निधीवर स्वतः लक्ष ठेवून जनतेने दर्जेदार काम करून घेणे गरजेचे आहे. आता जनतेलाच या लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवावा लागेल. तरच काही प्रमाणाततरी परिस्थिती सुधारेल असे परशुराम उपरकर शेवटी म्हणाले.

Web Title: Budget session: Opposition-ruling party busy in removing unidhuni, Criticism of Parashuram Upkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.