नगरपंचायतीसाठी मोर्चेबांधणी करा

By admin | Published: September 13, 2015 09:54 PM2015-09-13T21:54:06+5:302015-09-13T22:14:06+5:30

विनायक राऊत : दोडामार्ग येथील बैठकीत शिवसेना कार्यकर्त्यांना आवाहन

Build a front for a municipal council | नगरपंचायतीसाठी मोर्चेबांधणी करा

नगरपंचायतीसाठी मोर्चेबांधणी करा

Next

कसई दोडामार्ग : दोडामार्ग नगरपंचायत भाजप-सेना-आरपीआय युती करून लढणार आहोत. नगरपंचायतीवर भगवा फडकावा, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. सत्ता आल्यास नगरपंचायतीमधून दोडामार्ग शहराचा विकास होईल. जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करा, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी दोडामार्ग येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.
दोडामार्ग तालुका शिवसेनेच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीचा विषय होता. यावेळी तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, गणेशप्रसाद गवस, संजय गवस, संजय देसाई, प्रदीप नाईक, पांडुरंग नाईक, सज्जन धाऊसकर आदी उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले, नगरपंचायतीची निवडणूक युती करून लढवावी, हा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा निर्णय असल्याने भाजप-शिवसेना-आरपीआय अशी युती करून लढणार आहोत. राष्ट्रवादी-काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी युती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सातबारा उतारा त्वरित देणे महसूल विभागाचे काम आहे. मात्र, आज-उद्या करून तहसीलदार खेपा मारायला लावत असतील, तर ते योग्य नाही. अशा मनमानी अधिकाऱ्याची बदली व्हावी, या मागणीसाठी धुरी यांनी आंदोलन केले होते. ते योग्य आहे. धुरी यांना पक्षाचा व माझा पूर्ण पाठिंबा आहे. ग्रामस्थांना एलईडी बल्ब देण्यात येत आहेत. हे बल्ब वापरल्याने विजेची बचत होते. यानंतर पंखेही देण्यात येणार आहेत. सुशिक्षित बेरोजगार, बचतगटांसाठी योजना आणल्या आहेत. पंतप्रधान कौशल्य विकास निधी ही योजना जिल्ह्यासाठी मंजूर केली आहे. तसेच कळणे मायनिंग बंद करण्याचे आश्वासन वचननाम्यात दिले होते. मात्र, ते त्वरित बंद करणे शक्य नाही. परंतु ते बंद होणार. सर्व अवैध धंदेही बंद करण्याचे आश्वासन खासदार राऊत यांनी दिले. (वार्ताहर)

Web Title: Build a front for a municipal council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.