ओसरगाव येथील दिलीप बिल्डकॉनच्या डेपोला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 09:40 PM2018-11-07T21:40:26+5:302018-11-07T21:40:37+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाठी उभारण्यात आलेल्या दिलीप बिल्डकॉन या कंपनीच्या ठेकेदाराच्या ओसरगाव येथील डेपोला आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली.
सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाठी उभारण्यात आलेल्या दिलीप बिल्डकॉन या कंपनीच्या ठेकेदाराच्या ओसरगाव येथील डेपोला आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. सुमारे दोन तास प्रयत्न करूनही ही आग आटोक्यात आली नव्हती. कणकवली आणि कुडाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबानी आग काहीशी आटोक्यात आणली आहे. याखेरीज दिलीप बिल्डकॉनचे पाण्याचे टँकर आणि वाळू यांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. डेपोमध्ये टायर, ऑईलचा साठा असल्याने आगीचा भडका उडाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून सांगण्यात आले. या आगीमध्ये कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे.