पोस्टमनच्या वाट्याला आव्हानांचे ओझे

By admin | Published: May 19, 2015 10:07 PM2015-05-19T22:07:33+5:302015-05-20T00:12:53+5:30

नव्या काळातील दूत : अनेक वर्षांचा दोस्त, सुख दु:खातील सोबती संकटात

The burden of challenges to postmen | पोस्टमनच्या वाट्याला आव्हानांचे ओझे

पोस्टमनच्या वाट्याला आव्हानांचे ओझे

Next

खेड : लोकजीवनाचा अविभाज्य घटक असलेला पोस्टमन काळाच्या ओघात मागे पडत चालला आहे. त्याच्यापुढे अनेक आव्हानांचे ओझे निर्माण झाले आहे. चांगल्या आणि वाईट गोष्टींचे आदान-प्रदान करणारे म्हणून त्यांची ओळख अनन्यसाधारण आहे. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी असलेला चाकरमानी पत्राव्दारे आपल्या खुशालीची माहिती कळवित असे़ तसेच कुटुंबासाठी मनीआॅर्डर देखील करीत असे़ याच मनीआॅर्डरवर त्याच्या कुटुंबाचा घरखर्च चालत असे़
एखादा गंभीररित्या आजारी पडलेल्या किंवा निधन झालेल्या चाकरमान्याची किंवा त्याच्या कुटुंबाकडून तार (टेलिग्रॅम) पाठविली जात असे़ यामुळे संबंधित कुटुंबातील व्यक्तींना याद्वारे माहिती मिळत होती. काही वेळा कुटुंबातील व्यक्तींना तार किंवा पत्र वाचता येत नसेल तर संबंधित पोस्टमनला ते वाचून दाखविण्याची गळ घातली जायची़ अशावेळी पोस्टमन देखील ते वाचून दाखवित असे़ सध्याच्या मोबाईल, इंटरनेट आणि संगणकाच्या युगामध्ये पत्रे, तार व मनीआॅर्डर जवळपास इतिहासजमा झाली आहे़ आता एस्एमएस आणि व्हॉटसअपने तर सार्वजनिक जीवनात मजबुत बस्तान बांधल्याने पोस्टमन या शब्दाचेच विस्मरण झाले आहे़ एरवी ग्रामीण भागामध्ये अनन्यसाधारण महत्व असलेल्या पोस्टमनचे आधुनिक तंत्रज्ञानामुळे महत्व कमी झाले आहे़ असे सअने तरीही आजही काही निवडक अतर्देशीय पत्रे, राखी पौर्णिमेलाा परदेशात बाहेरगावी असलेल्या बहिणी आपल्या भावाला पोस्टातील पाकिटाद्वारेच राख्या पाठवित. हे प्रमाण मात्र खुपच कमी आहे़ मनीआर्डर आणि शासकिय पेन्शन आजही काही प्रमाणात पोस्टाद्वारेच पोेहोच होते़ याकरीता ग्रामीण भागामध्ये पोस्टमन आणि पोस्टमास्तर काम करीत आहेत़ हे काम कमी आहे़ शिवाय कर्मचा-यांचे काम कमी झाल्याने त्यांना कायमस्वरूपी सामावुन घेणे केंद्राला अशक्य होते़ अनेकवेळा केंद्राच्या काही नव्याने असलेल्या योजनांचा अंमल करण्याचे आदेश याच पोस्टमनना दिले जातात़ त्याच वेतनात हे कर्मचारी काम करीत आहेत़ या विविध कारणांनी अनेकवेळा या कर्मचा-यांनी संप पुकारला होता़ तीव्र आंदोलनाची हाक देण्यात आली होती़ अखेर आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला होता़ कमी काम आणि कमी दाम यांमुळे अगोदरच बेजार झालेला हा पोस्टमन विविध आधुनिक तंत्रज्ञानामुळे भरपुर मेहनत घेणारा पोस्टमन हळुहळू इतिहासजमा होऊ लागला आहे की काय असा प्रश्न पडत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The burden of challenges to postmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.