घरफोडी सत्र सुरूच; महावितरणच्या वायरमनला मारहाण -: पोलीस हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 09:15 PM2019-08-25T21:15:27+5:302019-08-25T21:16:08+5:30

शुक्रवारी पहाटे चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला़ मात्र याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती़.

Burglary session begins; Police are shocked | घरफोडी सत्र सुरूच; महावितरणच्या वायरमनला मारहाण -: पोलीस हैराण

घरफोडी सत्र सुरूच; महावितरणच्या वायरमनला मारहाण -: पोलीस हैराण

Next
ठळक मुद्देसंशयितावर गुन्हा दाखल : चार महिन्यांचे वीज बिल थकित; गंभीर जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

कणकवली : गेल्या काही महिन्यांत कणकवलीत चोरट्यांचे घरफोडी सत्र सुरूच आहे़ शिवाजीनगरमध्ये गेल्या महिनाभरात तीन वेळा चोरीचा प्रयत्न पंधरा ते वीस ठिकाणी चोरट्यांनी केला आहे़ विविध निवासी इमारतींमध्ये बंद असलेले फ्लॅट लक्ष्य करण्याचे काम चोरटे करीत आहेत़. शुक्रवारी पहाटे चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला़ मात्र याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती़. चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कणकवलीत गस्त वाढविली आहे़
कणकवलीत काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालत घरफोड्या केल्या. त्यानंतर चोरट्यांनी ग्रामीण भागाला लक्ष्य करीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. आता पुन्हा शहरात चोरीचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांत भीती वाढली आहे.

कणकवलीतील शिवाजीनगर येथील परबवाडी रस्त्यालगत रामेश्वर दिर्बादेवी प्लाझा संकुलात घरफोडी झाल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे उघडकीस आला आहे़ तसेच या निवासी इमारतीमधील बी विंगमधील दुसºया मजल्यावरील एका फ्लॅटचा कडी कोयंडा तोडलेल्या स्थितीत सकाळी दिसून आला. या घरातील राहणारे भाडेकरू बाहेर होते़ घरात काही विशेष साहित्य नसल्याने चोरट्यांचा डाव फसला़ मात्र पुन्हा कणकवलीत चोरटे सक्रीय झाल्याच्या चर्चेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महावितरणच्या वायरमनला मारहाण

मालवण : चार महिन्यांचे वीज बिल थकित असल्याने ते भरा असे सांगण्यास गेलेल्या येथील महावितरणचे वायरमन दिगंबर दिनकर मातले यांना रमेश चव्हाण (रा. कुंभारमाठ फोंडेकरवाडी) याने गंभीर मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. जखमी मातले यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येथील महावितरणचे वायरमन दिगंबर मातले हे सहकारी संदेश मेस्त्री यांच्यासमवेत कुंभारमाठ फोंडेकरवाडी येथे वीज बिलाच्या वसुलीसाठी गेले होते.

मालवण तालुक्यातील कुंभारमाठ फोंडेकरवाडीतील रमाकांत विश्वास चव्हाण यांच्या नावे असलेले चार महिन्यांचे वीज बिल थकीत होते. त्यामुळे ते चव्हाण यांच्या घरी वसुलीसाठी गेले होते. त्यावेळी तेथे असलेल्या रमेश चव्हाण याला त्यांनी तत्काळ वीज बिल भरा असे सांगितले. वायरमन मातले यांनी चार महिन्यांचे वीज बिल थकीत असल्याने ते लवकर भरा असे सांगितले असता रमेश चव्हाण याने त्यांना मारण्यास सुरुवात केली. मारहाणीत मातले हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या नाकातून रक्तस्राव होऊ लागल्याने त्यांना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी वायरमन मातले यांच्यावर उपचार केले. यावेळी महावितरणचे अधिकारी योगेश खैरे, गुरुदास भुजबळ तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, मंगेश माने यांनी ग्रामीण रुग्णालयात जात घटनेची माहिती दिली.

Web Title: Burglary session begins; Police are shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.