सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्या जाळण्याचे, हाणामारीचे प्रकार रोखा : संजिवनी पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:57 AM2019-03-14T11:57:55+5:302019-03-14T11:59:42+5:30

लोकसभा निवडणूक जाहीर झल्यानंतर जिल्ह्यात गाड्या जाळण्याचे व हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. हे गंभीर प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी.अशी मागणी स्वाभिमान पक्षाच्या शहरअध्यक्षा संजिवनी पवार यांनी कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली.

Burning of trains in Sindhudurg district, blocking the type of action: Sanjivini Pawar | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्या जाळण्याचे, हाणामारीचे प्रकार रोखा : संजिवनी पवार

पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांना स्वाभिमानच्या कणकवली महिला अध्यक्षा संजिवनी पवार यांनी निवेदन दिले. यावेळी सोबत स्वाभिमानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (छाया -अनिकेत उचले )

googlenewsNext
ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्या जाळण्याचे, हाणामारीचे प्रकार रोखा : संजिवनी पवार स्वाभिमान पक्षाची पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणूक जाहीर झल्यानंतर जिल्ह्यात गाड्या जाळण्याचे व हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. हे गंभीर प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी.अशी मागणी स्वाभिमान पक्षाच्या शहरअध्यक्षा संजिवनी पवार यांनी कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली.

यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, मेघा गांगण, संदीप मेस्त्री,अण्णा कोदे, प्रियाली कोदे, जितू कांबळी, हेलम कांबळी, सूरज पवार, शिवसुंदर देसाई, समर्थ कोळंबकर, बुथअध्यक्ष भक्ती राणे, अंकिता कर्पे, सुरेखा चव्हाण, भारती पाटील, उज्वला ताम्हाणेकर, शुभम देसाई, विराज येडे, चैतन्य मामजी आदी उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकदा हाणामाऱ्या व राजकीय कार्यकर्त्यांच्या गाड्या जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. सावंतवाडी तालुक्यात गृहराज्यमंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची कार अज्ञातांनी पेटवून दिली आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यादृष्टीने गंभीर असून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे आपला तालुका संभाळू शकत नाहीत. हे यावरून स्पष्ट झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची राज्यात अशा प्रकारे बदनामी होत असताना जिल्ह्यातील नागरिकांना भयमुक्त वातावरणात जीवन जगता यावे व लोकसभेची निवडणूक निर्भयपणे व शांततेत पार पाडावी यासाठी कणकवली शहरासह तालुक्यात पोलिसांच्या रात्र गस्तीच्या वेळेत वाढ करावी. निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील वातावरण कलुषित करून पराभवाच्या भीतीने अशा अनुचित घटना करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करावी.

कणकवली शहरात यापूर्वी गाड्या जाळण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे असे प्रकार पुन्हा शहरात व तालुक्यात घडू नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात सावंतवाडीतील घटनेचा संशय सत्ताधाऱ्यांच्या दिशेने व्यक्त होत असल्यामुळे हे प्रकरण दडपले जाण्याची भीती आहे.

तसेच अश्या घटना वारंवार जिल्ह्यात घडत असल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशा घटना घडू नये व शहरातील महिलांना भयमुक्त वातावरणात शहरात फिरता यावे म्हणून कणकवली पोलिसांनी तातडीने गस्तीत वाढ करावी.

 

Web Title: Burning of trains in Sindhudurg district, blocking the type of action: Sanjivini Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.