आज ‘मालवण बंद’ची हाक

By admin | Published: May 9, 2017 11:23 PM2017-05-09T23:23:38+5:302017-05-09T23:23:38+5:30

आज ‘मालवण बंद’ची हाक

Call of 'Malvan Bandh' today | आज ‘मालवण बंद’ची हाक

आज ‘मालवण बंद’ची हाक

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मालवण : ‘किल्ला विकणे आहे’ असा मजकूर फलकाच्याद्वारे प्रसारित करून महाराष्ट्र हादरवणाऱ्या तीन संशयितांना मालवण पोलिसांनी पहिल्याच दिवशी सोमवारी सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या युवकांनी फलक लावण्याचे कृत्य कोणाच्यातरी सांगण्यावरून केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे. याप्रकरणी अन्य दोन नावे समोर आल्याने याप्रकरणाचा गुंता वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, किल्ले प्रेरणोत्सव समिती व वायरी ग्रामपंचायत यांनी पोलिसांची भेट घेत याप्रकरणातील मुख्य सूत्रधारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर पोलीस तपासात ठोस पावले उचलण्यात न आल्याने किल्ले प्रेरणोत्सव समितीसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आज, मंगळवारी मालवण बंदची हाक दिली
आहे. व्यापारी संघ, पर्यटन व्यावसायिक, किल्ले होडी वाहतूक संघटना, श्रमिक मच्छिमार संघटना तसेच सर्वपक्षांनी
पाठिंबा दिल्याने किल्ला विकणे आहे प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
मालवण पोलिसांनी
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फलक लावणाऱ्यांच्या मुसक्या पहिल्याच दिवशी आवळल्याने शिवप्रेमींनी संयम ठेवला. अन्यथा संतप्त शिवप्रेमींचे उग्ररूप दिसणार होते. दुस?्या दिवशी सायंकाळपर्यंत पोलिसांनी संशयित युवकांवर गुन्हे अगर अटकेची कारवाई न केल्याने किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या पदाधिका?्यांनी नाराजी व्यक्त केली.
मालवणवासीय एकवटले
ऐतिहासिकतेची साक्ष देणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गच्या अस्मितेला गालबोट लागल्याने व पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन दुस?्या दिवशी अटकेची कारवाई न केल्याने मालवणवासियांनी ‘मालवण बंद’ची हाक दिली आहे. नागरिक तसेच शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. पोलिसांकडून ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांसह राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था एकवटले आहे. मालवण नगरपालिका उपनगराध्यक्ष दालनात प्रेरणोत्सव समिती व सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांनी मालवण बंदची हाक दिली आहे.

Web Title: Call of 'Malvan Bandh' today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.