आंबोली येथे कारला अपघात; दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:45 AM2020-01-29T11:45:48+5:302020-01-29T11:46:59+5:30

गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारला आंबोली घाटात अपघात झाला. या अपघातात कार उलटून चालकांच्या हाताला दुखापत झाली आहे. घटनेबाबत उशिरापर्यंत येथील पोेलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती.

Car accident at Amboli; Both men were injured | आंबोली येथे कारला अपघात; दोघे जखमी

आंबोली येथे कारला अपघात; दोघे जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देआंबोली येथे कारला अपघात; दोघे जखमीनेरूर येथे अपघात; दोघे जखमी

सावंतवाडी : गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारला आंबोली घाटात अपघात झाला. या अपघातात कार उलटून चालकांच्या हाताला दुखापत झाली आहे. घटनेबाबत उशिरापर्यंत येथील पोेलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती.

अपघातात चालकासह अन्य एकजण जखमी झाला असून, जखमीमध्ये लोंकेश्वर अथणी व संदीप शेट्ये यांचा समावेश असून दोघेही सांगली जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहेत.

मात्र, येथील पोलीस ठाण्यात संपर्क केला असता अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. जखमींना येथील कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा अपघात गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

नेरूर येथे अपघात; दोघे जखमी

कुडाळ : नेरूर जकात येथे चारचाकी व दुचाकीमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरून जाणारे रूपेश माने व अमित घाडी हे दोघेही युवक जखमी झाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रूपेश माने व अमित घाडी हे दुचाकीने मालवणच्या दिशेने जात होते. घाडी हा दुचाकी चालवित होता. या दरम्यान नेरूर जकात येथील मार्गावर आले असता मालवणहून कुडाळच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी व त्यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात माने व घाडी दोघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यांच्या पायाला या अपघातात मोठ्या स्वरूपात दुखापत झाली. या दोन्ही जखमींना येथील ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची नोंद कुडाळ पोलिसांत उशिरापर्यंत नव्हती.

Web Title: Car accident at Amboli; Both men were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.