आंबोलीत दारू वाहतूक करणारी कार ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 03:33 PM2021-05-07T15:33:34+5:302021-05-07T15:35:41+5:30
Amboli Police liquor ban Sindhudurg : आंबोली पोलीस तपासणी नाक्यावर बुधवारी पहाटे ५.१५ वाजता एक कार (के. ए. ०३ एम, एस. ९१७६) गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करीत असताना पोलिसांच्या जाळ्यात सापडली. तसेच कोल्हापूर येथील गजानन पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
आंबोली : आंबोली पोलीस तपासणी नाक्यावर बुधवारी पहाटे ५.१५ वाजता एक कार (के. ए. ०३ एम, एस. ९१७६) गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करीत असताना पोलिसांच्या जाळ्यात सापडली. तसेच कोल्हापूर येथील गजानन पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या आलिशान कारला आंबोली पोलीस तपासणी नाक्यावर थांबविले असता संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी गाडीची तपासणी केली. यावेळी त्यांना गोवा बनावटीची दारू भरलेली आढळून आली. लागलीच गाडी ताब्यात घेत गाडीतील मुद्देमालाचा पंचनामा केला. यावेळी गाडीसह ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यावेळी गजानन पाटील (रा. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई आंबोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली, पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, सुनील भोगन, दीपक शिंदे, राजेश नाईक, पोलीस मित्र महेंद्र परब यांनी मिळून केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.