करुळ घाटातील दरीत कार कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 05:42 AM2019-05-30T05:42:41+5:302019-05-30T05:42:55+5:30

करुळ घाटाच्या मध्यावर पाचशे फुट खोल दरीत कार कोसळली.

Car collapsed in the valley of Karal Ghat | करुळ घाटातील दरीत कार कोसळली

करुळ घाटातील दरीत कार कोसळली

Next

वैभववाडी : करुळ घाटाच्या मध्यावर पाचशे फुट खोल दरीत कार कोसळली. या अपघातातून कारमालक स्वप्नील रामचंद्र भाट(३२, रा. मुलुंड, मुंबई) हे सुदैवाने बचावले आहेत. त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला.
मुलुंड येथील स्वप्नील भाट हे आपली कार (क्रमांक एम.एच.०३,बीपी-८९२४) घेऊन कोल्हापुरहून गगनबावडामार्गे कणकवली येथे निघाले होते. करुळ घाट उतरत असताना एका धोकादायक वळणावर त्याचे नियंत्रण सुटल्यामुळे कारसह ते दरीत कोसळले. कोसळलेली कार पाचशे फुट खोल दरीत जाऊन स्थिरावली. या कारच्या मागोमाग असलेल्या ट्रक चालकाच्या समोरच हा अपघात घडल्यामुळे ट्रकचालक अणि क्लिनर या दोघेही कशाचाही विचार न करता ते दरीत उतरले. तोपर्यंत कारमालक भाट हे गाडीतून कसेबसे बाहेर निघत होते.
कारची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भाट यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली. ट्रकचालक आणि क्लिनरने कारमालक भाट यांना दरीतून बाहेर आणले. तेथून त्यांना गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान घाटात कार कोसळल्याची माहीती मिळताच वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दरीतील अपघातग्रस्त कारमध्ये आणखी कोणी आहे का? याचा दरीत उतरुन शोध घेतला. मात्र कुणीही आढळून आले नाही. जखमी कार मालक भाट यांच्यावर गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन अधिक उपचारासाठी कोल्हापुरला हलविण्यात आले.
>संरक्षक कठडाच नसल्याने कार गेली दरीत
घाटाच्या मध्यावरील धोकादायक वळणावरुन कार दरीत कोसळली. त्याठिकाणी संरक्षक कठडा किवा क्रॅश बॅरियर्स अस्तित्वात नाही. अन्यथा त्याला धडकून कार थांबली असती. धोकादायक वळणावर कठडा किंवा क्रॅश बॅरिअर्सची आवश्यकता असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल उपस्थितांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

Web Title: Car collapsed in the valley of Karal Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.