पोलिसांनी २१ जणांवर का गुन्हा दाखल केला पहा... तुम्ही अशी कोरोनाच्या काळात कृती करू नका...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 04:11 PM2020-05-02T16:11:56+5:302020-05-02T16:14:17+5:30
शहरातील मार्केटयार्डच्या पिछाडीस असलेल्या श्रीनाथ नगरमधील मोकळ्या मैदानामध्ये गुरुवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास काही मुले क्रिकेट खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन विमा मास्क क्रिकेट खेळत असलेल्या २१ जणांना ताब्यात घेतले.
कोरेगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत मास्क न घालता क्रिकेट खेळणाºया २१ जणांविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मार्केटयार्डच्या पिछाडीस असलेल्या श्रीनाथ नगरमधील मोकळ्या मैदानामध्ये गुरुवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास काही मुले क्रिकेट खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन विमा मास्क क्रिकेट खेळत असलेल्या २१ जणांना ताब्यात घेतले.
विजय लहू गायकवाड, अनिकेत संजय निकम, सीताराम संजय हिरेमठ, सागर प्रकाश जावळे, राजेंद्र त्रिशूल कांबळे, अनिल शिवाजी कुदळे, लखन प्रकाश जावळे, आशिष संजय खरात, उमेश बाळू पाटोळे, शुभम चंद्रकांत पाटोळे, सागर बाळू पाटोळे, संतोष बबन जावळे, विकास युवराज देडे, परबत रवींद्र शेलार, जीवन पोपट जाधव, मंगेश भगवान माने, चंद्रकांत गोरख जावळे, सेवागिरी ज्ञानेश्वर राऊत, संतोष यारशी गडवी, गौतम यारशी गडवी, राहुल राजू चकलिया यांच्या विरोधात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत मास्क न घालता क्रिकेट खेळत असल्याबद्दल पोलीस कर्मचारी महेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सुधीर खुडे तपास करत आहेत.
तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सादिक गफ्फूर शेख (रा. कोरेगाव) याच्याविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हवालदार प्रमोद चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक सनी आवटे तपास करत आहेत.