पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी शिवसैनिकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 06:30 PM2021-04-08T18:30:47+5:302021-04-08T18:33:12+5:30

Crimenews Sindhudurg- आचऱ्याहून वाळू भरून येणारा ट्रक अडवून चालकाशी वाद घालत असताना पोलीस हवालदार झुजे फर्नाडिस हे वाद सोडवण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ करत मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी रमेश अशोक चव्हाण ( ३१ , कलमठ ) या शिवसैनिका विरोधात कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास कणकवलीतील पोलीस पेट्रोल पंपाजवळ घडली .

A case has been registered against Shiv Sainik for assaulting a police officer | पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी शिवसैनिकावर गुन्हा दाखल

पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी शिवसैनिकावर गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्दे वाळू वाहतूक करणारा ट्रक अडवून करत होता वाद भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिसाला केली मारहाण

कणकवली : आचऱ्याहून वाळू भरून येणारा ट्रक अडवून चालकाशी वाद घालत असताना पोलीस हवालदार झुजे फर्नाडिस हे वाद सोडवण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ करत मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी रमेश अशोक चव्हाण ( ३१ , कलमठ ) या शिवसैनिका विरोधात कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास कणकवलीतील पोलीस पेट्रोल पंपाजवळ घडली .

याबाबत कणकवली पोलिस ठाण्यातील वाहन चालक हवालदार झुजे फर्नाडिस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रीमेश चव्हाण हा कणकवली पोलीस पेट्रोल पंपाजवळ आचरा येथून येणारा वाळू भरलेला ट्रक अडवून चालकाशी बाचाबाची करीत होता . त्याच्या भांडणाचा आवाज ऐकून आपण भांडण सोडविण्यासाठी पुढे गेलो. त्यावेळी रिमेश याने मला शिवीगाळ करून किरकोळ मारहाण केली व धमकी दिली .

दरम्यान, याबाबत हवालदार फर्नाडिस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भा.द.वि. कलम ३५३ , ३३२ , ५०६ , ५०४ , १८८,२६९, २७० अन्वये रिमेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच रिमेश चव्हाण याने आपल्याला मारहाण करून अंगावरील शर्ट फाडल्याची तक्रार दिल्यानुसार झुजे फर्नाडिस यांच्याविरुद्ध कणकवली पोलिसात भा . द . वि . कलम ३२३ , ४२७ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी वाळू वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून , त्या ट्रकवर कारवाईबाबत महसूलला माहिती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले .

Web Title: A case has been registered against Shiv Sainik for assaulting a police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.