काजू बीचा बाजारभाव ११६ रूपये निश्चित
By Admin | Published: March 27, 2016 12:58 AM2016-03-27T00:58:28+5:302016-03-27T00:58:28+5:30
कृषी बाजार समितीतर्फे माहिती
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीने काजू बी विक्रीचा दर निश्चित केला आहे. ११६ रुपये किलो असा दर करण्यात आला आहे. या दरापेक्षा कमी दराने काजू निश्चित करण्यात आला असून या दरापेक्षा कमी दराने काजू बी व्यापाऱ्यांनी खरेदी करू नये तयेच शेतकऱ्यांची विक्री करू नये असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. या जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांना काजूच्या बागा केल्या आहेत. यातून मिळाणाऱ्या उत्पन्नांतून ग्रामीण भागातील असंख्य नागरिक पावसाळ््यात लागणारे धान्य घरामध्ये भरत असतात.
मात्र, काजू दर निश्चित नसल्याने मिळेल त्या दराने व्यापाऱ्याकडून काजूची खरेदी केली जाते. परिणामी शेतकऱ्यांला त्याचा आर्थिक फटका बसत असतो. त्यामुळे काजूचा बाजार भाव निश्चित करावा अशी मागणी कृषी समिती सभेत वारंवार केली जात होती.
त्यानुसार सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीने प्रति किलोमागे ११६ रुपये एकढा काजू बीचा बाजारभाव निश्चित केला आहे. याच भावाने व्यापाऱ्यांनी काजू बी खरेदी करावी, तसेच शेतकऱ्यांनी विक्री दरही निश्चित करण्यात येणार असून याचा दर मागाहून जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कोणत्या अडचणी किंवा तक्रारी असल्यास ०२३६२-२२८४१३ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)