काजू, आंबा बाग जळून खाक मडुर्‍यातील घटना : दहा लाखांचे नुकसान; शेतकर्‍याला फटका

By Admin | Published: May 19, 2014 12:30 AM2014-05-19T00:30:21+5:302014-05-19T00:33:30+5:30

बांदा : मडुरा-रेडकरवाडी येथील शांताराम विष्णू सावळ यांच्या काजू, आंबा कलम बागेला आग लागून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.

Cashew, mango orchard, burnt incidents: loss of ten lakhs; Hit the farmer | काजू, आंबा बाग जळून खाक मडुर्‍यातील घटना : दहा लाखांचे नुकसान; शेतकर्‍याला फटका

काजू, आंबा बाग जळून खाक मडुर्‍यातील घटना : दहा लाखांचे नुकसान; शेतकर्‍याला फटका

googlenewsNext

बांदा : मडुरा-रेडकरवाडी येथील शांताराम विष्णू सावळ यांच्या काजू, आंबा कलम बागेला आग लागून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. काल रात्री ही आग लागली. मात्र अद्यापपर्यंत महसूलकडून पंचनामा करण्यात न आल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मडुरा- रेडकरवाडी येथे सावळ यांच्या मालकीचे मोठे बागायती क्षेत्र आहे. याठिकाणी काल रात्री उशिरा शॉर्टसर्किट होऊन आग लागली. रात्र असल्याने तसेच बागायतीत गवत असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. मडुरा येथील शेतकरी सावळ यांची या आगीत ५०० काजू कलमे, ५० हापूस आंबा कलम, ३०० सागाची झाडे तसेच जंगली झाडे व गवत गंजी जळून खाक झाली. आग लागल्याचे उशिरा लक्षात आले. रात्री उशिरा साई पावसकर, सूर्यकांत परब, रामा सावळ, लक्ष्मण सावळ, प्रजया सावळ यांनी पाणी व मातीच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बागायतीतील गवत गंजी तसेच गवताने पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. यात संपूर्ण बागायती आगीच्या भक्षस्थानी पडली. मध्यरात्री उशिरापर्यंत आग विझविण्यात यश आले. आज सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्यात आला नव्हता. या आगीत सुमारे दहा लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज सावळ यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cashew, mango orchard, burnt incidents: loss of ten lakhs; Hit the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.