काजूला १२० प्रति किलोचा दर : ग्राहकांमधून समाधान, बाजारात मात्र ९0 रुपयांचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 04:25 PM2020-04-14T16:25:37+5:302020-04-14T16:26:48+5:30
दोडामार्ग : कोरोनामुळे अत्यंत अडचणीत सापडलेल्या काजू बागायतदार शेतकऱ्यांना दोडामार्ग तालुका शेतकरी संघटनेने बाजारात ९० रुपये इतक्या कवडीमोल भावाने ...
दोडामार्ग : कोरोनामुळे अत्यंत अडचणीत सापडलेल्या काजू बागायतदार शेतकऱ्यांना दोडामार्ग तालुका शेतकरी संघटनेने बाजारात ९० रुपये इतक्या कवडीमोल भावाने घेतल्या जाणाºया काजू बीला १२० रुपये प्रति किलो भाव देऊन मोठा दिलासा दिला आहे. दोडामार्ग तालुका शेतकरी संघटनेने रविवारपासून तालुक्यात काजू बी खरेदीचा उसप गावातून शुभारंभ केला.
काजू बागायतदार शेतकऱ्यांनी डगमगू नये. थोडा संयम राखावा. अजूनही दरवाढ मिळू शकते, असे आवाहन केले आहे. मात्र, कोरोना आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतक-यांना काजू बागायतदार संघटनेने काजू बीला १२० रुपये दर देऊन घेतलेल्या धाडसी निर्णयाचे शेतकºयांनी जोरदार स्वागत केले आहे.
गेल्यावर्षी तब्बल १७९ व यावर्षी १४० रुपये प्रतिकिलो असलेला काजू बी दर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी व कारखानदार यांनी अवघ्या ८०-९० वर आणला. त्यामुळे शेतकºयांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. शेतकºयांचे हे दु:ख व होणारे नुकसान, दूर करण्यासाठी शेतकरी संघटना या नैसर्गिक व जैविक आपत्तीत शेतकºयाला सावरण्यासाठी पुढे आली. रविवारपासून प्रत्यक्ष खरेदीलासुद्धा तालुक्यातील उसप गावातून सुरुवात केली.
संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, पंचायत समिती सदस्य बाळा नाईक, विठोबा पालयेकर, विश्वास धर्णे, संतोष देसाई, आनंद गावडे आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते. संघटनेच्या या धाडसी निर्णयाचे तालुक्यातील काजू बागायतदार यांनी जोरदार स्वागत केले आहे.