कास नं. १ शाळेत भरविला दिवाळीचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 05:04 PM2017-10-16T17:04:20+5:302017-10-16T17:04:20+5:30

दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटाह्ण या उक्तीनुसार दिवाळी सणासाठी लागणाऱ्या विविध स्वनिर्मित साहित्याची निर्मिती व विक्री करून विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञानाचे धडे देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा कास नं. १ प्रशालेत दिवाळी सणासाठीच्या साहित्याचा बाजार भरविला होता.

Cass no 1 Diwali market filled with school | कास नं. १ शाळेत भरविला दिवाळीचा बाजार

कास दिवाळी सणासाठी बनविलेल्या साहित्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. (निलेश मोरजकर)

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी स्वनिर्मित साहित्याची विक्री करून केली कमाई

बांदा , दि. १६ : दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा या उक्तीनुसार दिवाळी सणासाठी लागणाऱ्या विविध स्वनिर्मित साहित्याची निर्मिती व विक्री करून विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञानाचे धडे देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा कास नं. १ प्रशालेत दिवाळी सणासाठीच्या साहित्याचा बाजार भरविला होता.

विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या या प्रशालेत मुख्याध्यापक स्वाती नाईक, प्रकाश गावडे, महेश पालव, भावना सबनीस, स्वाती पाटील या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आकर्षक आकाशकंदील, सुगंधी उटणे, मेणबत्त्या, भेटकार्ड आदी दिवाळी सणासाठीच्या उपयुक्त साहित्याची निर्मिती करून स्वनिर्मितीचा अनुभव धन्यवाद घेतला .


विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या साहित्याची विक्री व प्रदर्शनाचा बाजार शाळेत भरविला होता. या बाजारात विद्यार्थ्यांना बनविलेल्या साहित्याची खरेदी कास गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला.

शाळेत राबविलेल्या या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक, माता-पालक संघ यांचे सहकार्य मिळाले. विद्यार्थी व शिक्षकांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Web Title: Cass no 1 Diwali market filled with school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.