वसुबारसदिवशीच कुडाळमध्ये रेल्वेने उडविले गुरांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 04:23 PM2017-10-16T16:23:59+5:302017-10-16T16:31:55+5:30
कुडाळ रेल्वे स्थानकामध्ये रुळावर आलेल्या तीन गुरांपैकी एका जनावराला दुरांतो एक्सप्रेस रेल्वेने उडविले. हा अपघात सोमवारी सायंकाळी घडला. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ही दुर्घटना घडली. दुर्देवाने आजच वसुबारस असल्याने यादिवशीच या गुरांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्गनगरी, दि. १६ : कुडाळ रेल्वे स्थानकामध्ये रुळावर आलेल्या तीन गुरांपैकी एका जनावराला दुरांतो एक्सप्रेस रेल्वेने उडविले.
हा अपघात सोमवारी सायंकाळी घडला. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ही दुर्घटना घडली. दुर्देवाने आजच वसुबारस असल्याने यादिवशीच या गुरांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा झाल्याच्या प्रकाराला एक दिवस उलटत नाही, तोच दुसऱ्या दिवशी कोकणातच कुडाळजवळ दुरांतो एक्सप्रेसखाली जनावराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रवाशांच्या आणि जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
दुरांतो एक्सप्रेसच्या रेल्वे चालकाने हॉर्न मारून वाटेत येणाऱ्या या जनावरांना सावध करण्याचा प्रयत्न केला. त्यातील दोन पांढºया रंगाची गुरे बाजूच्या ट्रॅकवर गेली, मात्र काळ्या रंगाचे जनावर तेथेच थांबल्याने ते रेल्वेखाली आहे.
आजच्या वसुबारसदीवशीच हे जनावर मृत्यूमूखी पडल्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे मात्र रेल्वे रुळ असलेल्या परिसरात सोडलेल्या मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.