चुकीच्या जागेमुळे बंधाºयाचा खर्च पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 03:18 PM2017-07-30T15:18:09+5:302017-07-30T15:21:41+5:30
पाचल : राजापूर तालुका कृषी विभागाने नियम व निकष धाब्यावर बसवत तसेच कोणत्याही तांत्रिक बाबी विचारात न घेता तळवडे -भटवाडी येथील ओढ्यावर चुकीच्या ठिकाणी बंधारा बांधला आहे. पहिल्याच पावसात हा बंधारा गाळाने भरला असून, पाण्याखाली गेला आहे.
पाचल : राजापूर तालुका कृषी विभागाने नियम व निकष धाब्यावर बसवत तसेच कोणत्याही तांत्रिक बाबी विचारात न घेता तळवडे -भटवाडी येथील ओढ्यावर चुकीच्या ठिकाणी बंधारा बांधला आहे. पहिल्याच पावसात हा बंधारा गाळाने भरला असून, पाण्याखाली गेला आहे.
या बंधाºयातील पाणी कमी करण्यासाठी अखेर कृषी विभागावर बंधाºयाचा काही भाग तोडण्याची नामुष्की ओढवली. शासनाचे लाखो रूपये या कामावर खर्च झाले आहेत. त्यामुळे या बंधाºयाच्या कामाची जिल्हाधिकाºयांमार्फत चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हा बंधारा पाचल - जवळेथर रस्त्यावरील मोरीलगतच बांधल्याने बंधाºयातील तुंबलेल्या पाण्यामुळे मोरीलाही धोका निर्माण झाला आहे.
या बंधाºयापासून काही अंतरावर बारमाही वाहणारी अर्जुना नदी आहे. तसेच बंधाºयाच्या आजुबाजूला शेती अथवा वस्तीही नाही. त्यामुळे नेमका हा बंधारा कोणासाठी बांधण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा बंधारा बांधताना अधिकाºयांनी तांत्रिक बाबींचा विचार केलेला दिसत नाही. शासनाच्या अंदाजपत्रकाप्रमाणे बंधाºयाचे काम झाले नसल्याचे उघड झाले असल्याचेही तळवडे येथील ग्रामस्थांनी सांगितले. हा बंधारा योग्य जागी बांधला असता तर त्याचा उपयोग गावासाठी झाला असता असेही ग्रामस्थांनी सांगितले.
बंधाºयाचे मुल्यांकन करताना उपअभियंत्याच्या या गोष्टी लक्षात का आल्या नाहीत, असा सवाल तळवडे येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. कृषी विभागाने चुकीच्या ठिकाणी बांधलेल्या बंधाºयामुळे शासनाचे लाखो रूपये वाया गेले आहेत. त्यामुळे तळवडेतील या बंधारा कामाची जिल्हाधिकाºयामार्फत चौकशीची मागणी केली आहे.