आंबोली महादेवगड पॉईंट येथे आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:45 PM2020-12-14T16:45:58+5:302020-12-14T16:48:55+5:30
AmboliHillStation, Sindhudurgnews सृष्टीतील सर्व पर्यावरणीय घटक महत्त्वाचे आहेत. या पर्यावरणीय घटकांचे संवर्धन करणे तसेच असलेली निसर्ग संपदा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत पांढरकवडा वन्यजीव विभागाचे अधिकारी सुभाष पुराणिक यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
आंबोली : सृष्टीतील सर्व पर्यावरणीय घटक महत्त्वाचे आहेत. या पर्यावरणीय घटकांचे संवर्धन करणे तसेच असलेली निसर्ग संपदा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत पांढरकवडा वन्यजीव विभागाचे अधिकारी सुभाष पुराणिक यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या संस्थेच्यावतीने आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिनाच्या निमित्ताने महादेवगड पॉईंट आंबोली येथे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश नारकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्वत पूजन कार्यक्रम झाला. यावेळी पुराणिक बोलत होते.
कोकण आणि त्यामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग म्हणजे जैवविविधतेचा सागर आहे. येथील सजीवसृष्टीचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज विकासाच्या नावाखाली निसर्ग संपत्तीची हानी होत आहे. वनविभाग आणि पोलीस विभाग यांच्या माध्यमातून वनसंरक्षण केले जाते. तसेच माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेच्या माध्यमातूनही पर्यावरण संवर्धनाची चळवळ वाढण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही सुभाष पुराणिक म्हणाले.
माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेचा उद्घाटन समारंभ आणि आंतरराष्ट्रीय पर्वत दिन असा संयुक्त कार्यक्रम होत असून हा एक सुवर्णयोग असल्याचे आपल्या प्रास्ताविकात सचिव एस. एन. पाटील यांनी सांगितले.
यावेळी या क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे वन्यजीव अधिकारी सुभाष पुराणिक यांच्यासह रेस्क्यू तज्ज्ञ बाबल अल्मेडा (सावंतवाडी), डॉ. बापू भोगटे (कुडाळ), रमाकांत नाईक (वेंगुर्ला), फुलपाखरू तज्ज्ञ हेमंत ओगले (आंबोली), गिर्यारोहक व पत्रकार अनिल पाटील (गोवा), पत्रकार काका भि (आंबोली) व संस्थेचे अध्यक्ष प्रकाश नारकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
इतिहास, गिर्यारोहण आणि पर्यटन यांचा समन्वय साधून या क्षेत्रात एक चांगले काम उभे राहण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सर्वांना एकत्र घेऊन काम करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रकाश नारकर यांनी केले. उपाध्यक्ष डॉ. कमलेश चव्हाण यांनी आभार मानले.
नांगरतास येथे रॅपलिंग, ट्रेकिंग, स्विमिंग क्रीडा प्रकार
दुसऱ्या सत्रात कमलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांगरतास येथे रॅपलिंग, ट्रेकिंग, स्विमिंग, बर्डिंग व व्हॅली क्रॉसिंग इत्यादी विविध क्रीडा प्रकार करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिकांसह जिल्ह्यातील हर्षल नाडकर्णी, सदस्य डॉ. गणेश मर्गज, अतिश माईणकर, डॉ. निहाल नाईक, मायकल डिसोजा आदी सहभागी झाले होते.
यावेळी उत्तम नार्वेकर, संतान अल्मेडा, राजेश आमृसकर, संदेश गोसावी, देवेश रेडकर, कोमल रेडकर, प्रथमेश धुरी, बाळकृष्ण गावडे, पवन गावडे, तुकाराम गावडे, प्रतीक गावडे, ऋतिक गावडे, दीपक कदम, राहुल चव्हाण तसेच बाबल अल्मेडा टिम, आंबोली रेस्क्यू टिम, सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर टिम व शिवप्रेमी सिंधुदुर्ग टिमचे प्रतिनिधी व निसर्गप्रेमी उपस्थित होते.